mockery agitation in pune against pot holes | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

दोन माजी महापौर, माजी उपमहापौर यांचा `पोरखेळ`

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे : पुणे शहरात  अनेक ठिकाणी पडलेल्या खडड्यांच्या विरोधात दोन माजी महापौरांसह एका माजी उपमहापौराने पोरखेळ आंदोलन केले. प्रदेश काॅंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी या आंदोलनाचे आय़ोजन केले होते.

स्वारगेट येथील जेधे चौकात हे आंदोलन झाले. नागरिकांना खड्ड्यांचा गाडी चालवताना खूप त्रास होत आहे. पुण्यात अनेक दुर्घटना घडल्या तरी या प्रशासनला जाग येत नाही, त्यामुळे हे आंदोलन केल्याचे बालगुडे यांनी सांगितले.

गणेश मंडळांना खड्यांसाठी दंड मग ज्या ठेकेदार आणि केबल कंपन्या यांनी खड्डे केलय त्यांना माफी का, असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने विट्टी दांडू, गोट्या खेळून आणि खड्यात वृक्षरोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले.

या वेळी माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, अंकुश काकडे, माजी उपमहापौर सतीश देसाई. काँग्रेस पधाधिकारी बाबा नायडू, अप्पा शेवाळे, ऋषिकेश बालगुडे, आदि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. " पुणे शहरातील खड्डे बुजवा नाहीतर महापौरांनी राजीनामा घ्यावा " अशी घोषणा सर्वांनी केल्या.

हे सर्व पदाधिकारी जाणते असतानाही त्यांनी पोरखेळ आंदोलन केल्याबद्दल तो चर्चेचा विषय झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख