विद्यमान आमदार, माजी आमदाराला म्हणाले, "हा तर पिसाळलेला कुत्रा "! 

विद्यमान आमदार, माजी आमदाराला म्हणाले, "हा तर पिसाळलेला कुत्रा "! 

भंडारा : धान खरेदी केंद्रातील भ्रष्टाचारप्रकरण तुमसार-मोहाडी मतरदारसंघात सध्या गाजत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अशातच ""चरण वाघमारे हा एक पिसाळलेला कुत्रा* असून त्याच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहू नये अशा भाषेत विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 

तुमसर-मोहाड़ी विधानसभा क्षेत्रातील आजी-माजी आमदारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून एकमेकांना लक्ष्य केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून धान खरेदी केंद्राचा विषय सातत्याने सुरू आहे,याच खरेदी केंद्रासाठी नवीन धान्य खरेदी केंद्र देतांना नियमाची पायमल्ली केली असल्याचा आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला.

या वर्षी नवीन 25 खरेदी केंद्रांना जिल्हा मार्केटिंग अधिकारात तर्फे परवानगी देण्यात आली, मात्र ही परवानगी देतांना त्या सुशिक्षित बेरोजगार संस्था ज्यांना ब वर्ग सभासद केले नाही अशाही संस्थेला धान खरेदी केंद्र उघडण्याची परवानगी देण्यात आली आणि या सर्व संस्थांवर मोठ्या प्रमाणात धान घोटाळे होत असल्याचे म्हटले आहे. 

2014 मध्ये ज्या पद्धतीने तुमसर विधानसभा क्षेत्रात धान खरेदी केंद्रांवर घोटाळे झाले होते तसेच घोटाळे पुन्हा यावर्षीही होतील असा आरोप त्यांनी केला, विशेष म्हणजे 2014 मध्ये राजू कारेमोरे यांनी कोट्यावधी रुपयांचा धान खरेदी घोटाळा केल्याचा आरोपचरण वाघमारे यांनी केला होता. त्याची चौकशी अजूनही सुरू आहे. 

वाघमारे यांच्या आरोपाला उत्तर देताना कारेमोर यांनी म्हटले आहे, की ते खोटे असून मार्केटिंग अधिकारी हे नियमानुसारच संस्थांना खरेदीचे अधिकार देतात,नव्याने निर्माण केलेल्या संस्थांमध्ये वेगळी हमाली घेतली जात नाही. शेतकऱ्यांचा मालाचा 24 तासात काटा केला जातो. इथे शेतकऱ्यांची लूट होत नाही उलट तुमच्या कांदरी या ठिकाणच्या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com