MNS's Existence not in Rural Maharashtra Say Sharad Sonawne | Sarkarnama

मनसेची ग्रामीण भागात बांधणी नसल्याने शिवसेनेत प्रवेश : शरद सोनवणे

उत्तम कुटे
रविवार, 10 मार्च 2019

मनसेची ग्रामीण भागात बांधणी नाही. त्यामुळे तेथे संघर्ष करावा लागतो.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताकदीने लढता येत नाहीत. म्हणून शिवसेनेसारख्या केडरबेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी आज सोनवणे 'सरकारनामा'ला सांगितले.

पिंपरी : मनसेची ग्रामीण भागात बांधणी नाही. त्यामुळे तेथे संघर्ष करावा लागतो.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताकदीने लढता येत नाहीत. म्हणून शिवसेनेसारख्या केडरबेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी आज सोनवणे 'सरकारनामा'ला सांगितले. राष्ट्रवादी आणि शिवसेना असे दोन पर्याय होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार शिवसेनेची निवड केली,असे ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत,शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच बाजीराव दांगट हे मुंबईतील शिवसेनाभवनात होणाऱ्या सोनवणेंच्या पक्षप्रवेशाला हजर राहणार आहेत. यावेळी ते जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे समजते. जुन्नरहून काही शेकडो मोटारींचा ताफा यासाठी मुंबईला नेण्याची तयारी सुरू आहे.

जुन्नरची जागा ही शिवसेनेची असेल व तेथील उमेदवारी नक्की झाल्यानंतरच सोनवणेंनी शिवसेनेत परतण्याचा हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या बोलण्यातूनच समजले. यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत 'वर्षा' वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तत्पूर्वी ते मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही भेटले. त्यांचे त्यांनी आभार मानले. तसेच दिलगिरीही व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख