MNS Wanrns Police About Growing Crime in Nashik | Sarkarnama

नाशिकला चोरांचे शहर होऊ देऊ नका, नाही तर रस्त्यावर उतरु - मनसेचा इशारा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 जून 2019

शहरात गेल्या पंचवीस दिवसांत दोनशेहून अधिक गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे नागीरक, राजकीय नेते सगळेच अस्वस्थ आहेत. रोजच्या गुन्हेगारीच्या घटनांनी हे शहर गुन्हेगारांचे होऊ देऊ नका, कोम्बींग ऑपरेशन राबवून ते नियंत्रणात आणा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नाशिक : शहरात गेल्या पंचवीस दिवसांत दोनशेहून अधिक गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे नागीरक, राजकीय नेते सगळेच अस्वस्थ आहेत. रोजच्या गुन्हेगारीच्या घटनांनी हे शहर गुन्हेगारांचे होऊ देऊ नका, कोम्बींग ऑपरेशन राबवून ते नियंत्रणात आणा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

विविध सामाजिक उपक्रमांमुळे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील चर्चेत असतात. मात्र या कालावधीत शहरातील गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. त्यावर नियंत्रणासाठी आता विविध राजकीय पक्ष तक्रारींसाठी पुढे येऊ लागले आहेत. शहरातील मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काल पोलिसांना निवेदन देऊन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले आहे. शहरात पंचवीस दिवसांत सहा खून, 7 विनयभंग, 3 बलात्कार, 20 घरफोड्या, 11 मोबाईल फोन चोरी, 24 अन्य चोऱ्या, 29 दुचाकीच्या चोऱ्या, 7 सोनसाखळी चौरी, 11 लुटमारीच्या घटना, दोन खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नागरीकांत असुरक्षितता आहे. 

मुत्थूट फायनान्सवर दरोडा व हत्येचा प्रकार घडला. त्यात तीन संशयीतांना अटक झाली. मात्र भरवस्तीत असे प्रकार घडू लागल्याने घबराट पसरली आहे. एरव्ही शांत असलेल्या नाशिक शहरात गुन्हेगारी डोके वर काढू लागली आहे. हे गुन्हेगारांचे शहर होऊ पहात आहे. त्याला वेळीच पायबंद घालावा, अन्यथा मनसेच्या सैनिकांना रस्त्यावर उतरुन जनजागृती करावी लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शहराध्यक्ष अनिल मटाले, साहेबराव खर्जुल, बंटी कोरडे, किशोर जाचक, उमेश मोढे, शशिकांत चौधरी, विजय बोरसे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख