नाशिकमध्ये मनसेच्या आढावा बैठकीस राहुल ढिकले यांची दांडी

अॅड. राहुल ढिकले गेले वर्षभर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची तयारी करीत आहेत. त्यांनी दोन महिन्यांपासून रिक्षांवर फलक लावून आपल्या निवडणुकीचा बिगुल वाजविला. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या या फलकावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे छायाचित्र गायब झाले.
MNS Vice President Rahul Dhikle
MNS Vice President Rahul Dhikle

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांनी दांडी मारली. राहुल ढिकले नाशिक पूर्व मतदारसंघातील प्रमुख इच्छुक असून गेले काही दिवस ते भाजप, शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांनी बैठकीला दांडी मारल्याने या बाबतच्या चर्चेला जोर आला आहे. 

अॅड. राहुल ढिकले गेले वर्षभर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची तयारी करीत आहेत. त्यांनी दोन महिन्यांपासून रिक्षांवर फलक लावून आपल्या निवडणुकीचा बिगुल वाजविला. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या या फलकावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे छायाचित्र गायब झाले. 

त्यात अॅड. ढिकले भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा पसरली. त्याचा अॅड. ढिकले यांनीही इन्कार केला नाही. आज ते पक्षाच्या बैठकीस अनुपस्थित होते. त्यांचा मोबाईल देखील कार्यरत नव्हता. यासंदर्भात मनसेचे नेते अभिजित पानसे, संदीप देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता, ढिकले काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याचा निरोप आहे. ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com