पिंपरी-चिंचवडला घड्याळाबरोबर इंजिनही धावणार

मनसेने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसह या पक्षाने पुरस्कृत केलेले दोन अशा तिन्ही उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा काल जाहीर केला. यामुळे चिंचवडमधील अपक्ष शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांना मनसेच्या इंजिनचे बळ मिळाले आहे.
MNS Supports NCP in Pimpri
MNS Supports NCP in Pimpri

पिंपरी : मनसेने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसह या पक्षाने पुरस्कृत केलेले दोन अशा तिन्ही उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा काल जाहीर केला. यामुळे चिंचवडमधील अपक्ष शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांना मनसेच्या इंजिनचे बळ मिळाले आहे.

मोदी, शहाविरोधातील लढाईचा भाग म्हणून हा पाठिंबा दिल्याचे मनसेचे राज्य नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले. जेथे मनसेचा उमेदवार नाही,तेथे दोन्ही कॉंग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.पिंपरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे, भोसरी व चिंचवडमधील पुरस्कृत अनुक्रमे विलास लांडे व राहूल कलाटेंना पाठिंब्याचे पत्र त्यांनी यावेळी दिले. मात्र, राज ठाकरे यांची प्रचार सभा शहरात होणार नाही,असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कॉंग्रेसनेही शहरातील दोन्ही राष्ट्रवादी पुरस्कृतांना आज पाठिंबा जाहीर केला. निवडून आल्यानंतर आघाडीतच राहू या अटीवर तो दिल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देताना तो या पक्षाच्या दोघा पुरस्कृतांना देण्यास यापूर्वी कॉंग्रेसने विरोध केला होता.या दुहेरी पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी पुरस्कृत असे तिन्ही उमेदवार विजयी होतील,असा विश्वास लांडे यांनी व्यक्त केला.तर मनसेचा मानसन्मान राखत पक्षाच्या  फ्लेक्सवर राज ठाकरे यांचा फोटो घेऊ, असे बनसोडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com