मनसेच्या 'मेक ओव्हर' साठी राज ठाकरेंनी केले 'कात्रज'ला चिंतन!

भारतीय जनता पक्षाची आक्रमक राजकीय भूमिका, आगेकूच रोखण्यासाठी महाराष्ट्रात झालेल्या प्रयोगाची देशभर चर्चा आहे. यामध्ये दोन्ही कॉंग्रेससह शिवसेना एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केले. या स्थितीत भाजप प्रमुख विरोधी पक्ष असला तरी गेले पाच वर्षे तोच सत्तेत होता. सध्याचे अनेक प्रश्‍न भाजपनेच निर्माण केलेले आहे. अशा स्थितीत विरोधी पक्ष म्हणून राज्यात नव्या घटकाच्या उदयास मोठा वाव आहे.
Raj Thackeray Informal Talks with Party Office Bearers
Raj Thackeray Informal Talks with Party Office Bearers

नाशिक :  राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीत 'मनसे'च्या कृती व भूमिका दोन्हींना मोठी स्पेस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत कोणती रणनिती असावी यासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी कात्रजला (पुणे) येथे दिवसभर चर्चा मोजक्‍या पदाधिकाऱ्यांशी चर्चा अन्‌ चिंतन केले. यापुढे नागरीकांचे प्रश्‍न घेऊन 'मनसे' अधिक महत्त्वाचा रोल पार पाडेल असे संकेत त्यांनी दिले. येत्या 23 जानेवारीला मुंबईत होणाऱ्या अधिवेशनात त्याची घोषणा होईल.

भारतीय जनता पक्षाची आक्रमक राजकीय भूमिका, आगेकूच रोखण्यासाठी महाराष्ट्रात झालेल्या प्रयोगाची देशभर चर्चा आहे. यामध्ये दोन्ही कॉंग्रेससह शिवसेना एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केले. या स्थितीत भाजप प्रमुख विरोधी पक्ष असला तरी गेले पाच वर्षे तोच सत्तेत होता. सध्याचे अनेक प्रश्‍न भाजपनेच निर्माण केलेले आहे. अशा स्थितीत विरोधी पक्ष म्हणून राज्यात नव्या घटकाच्या उदयास मोठा वाव आहे. यावर सर्वात आकर्मक व प्रत्येक प्रश्‍नावर स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या 'मनसे'मध्ये पुढील दिशा ठरवण्यासाठी खलबते सुरु आहेत. 

यावर गेले अनेक दिवसांच्या चर्चेनंतर 'मनसे'प्रमुख राज ठाकरे यांनी काल पुण्यात कात्रज येथे ऐश्‍वर्य लॉन्स येथे राज्यातील जिल्हा प्रमुखांशी दिवसभर कार्यशाळा घेऊत्रन चर्चा केली. मोजक्‍या प्रतिनिधींशी खलबते झाली. त्यात या पुढे "मनसे' अधिक प्रभावी तसेच महत्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

या कार्यक्रमात त्यांनी राज्यात विधानसभेच्या किती जागा लढवल्या, तेथे मिळालेली मते, पदाधिकाऱ्यांची भूमिका, बंडखोरी, उमेदवारांनी केलेला खर्च, राबविलेली यंत्रणा ही सर्व माहिती संकलीत केली होती. 'मनसे'च्या सभांना प्रतिसाद होता, तरीही उमेदवारांना मते का मिळाली नाहीत, यावर आढावा घेतला गेला. या बैठकीस केवळ निमंत्रीतांनाचा प्रवेश होता. विशेष म्हणजे बैठकीत येतांना मोबाईल नेण्यास मनाई होती. चर्चेचा तपशील देखील बाहेर शेअर करु नये अशी ताकीद होती. यासंदर्भात येत्या 23 जानेवारीला मुंबईत मोठा मेळावा घेऊन त्यात भूमिका व धोरण जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीतही तो प्रयोग करण्याचे संकेत दिले आहेत. या स्थितीत भाजप एकटा पडेल. राज्यातील नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील यांसह विविध नेते भाजपबरोबर गेले. त्यामुळे ते भाजपपासून वेगळी भूमिका घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे राज्यातील राजकारणातील स्थान लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडले. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून 'मनसे'ची भूमिका, नेतृत्वाला मोठी स्पेस आहे. त्यासाठी पक्षाचा मेक ओव्हर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु होण्याचे संकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com