मुख्यमंत्र्यांना 'भैय्या भूषण' उपाधी देणाऱया मनसेने घेतला भारतरत्न  डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आधार 

Amberkar--MNS
Amberkar--MNS

मुंबई :  उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राच्या वैभवात भरच घातली आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर मनसेने   तत्काळ प्रतिक्रिया दिली .  मुख्यमंत्री हे  'भैय्या भुषण' आहेत अशी टिका मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी  केली.

  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयन नागरीकांना घेतलेल्या श्रमाबद्दलचे विधान मनसेने फेसबुक आणि ट्‌वीटवर शेअर केले आहे. मात्र, राज ठाकरे यांनी मात्र  याविषयावर अद्याप भाष्य केलेले नाही .   

फेरीवाल्यांपासून सुरु झालेला वाद आता भाषिक राजकरणावर पोहचला आहे. कॉंग्रेस आणि मनसेने मध्ये यावरुन हाणामारीही झाली. बुधवारी घाटकोपर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  उत्तर भारतातून आलेल्या नागरीकांचे कौतुक केले.

त्यावर मनसेच्या नेत्यांनी कडवट प्रतीक्रिया नोंदवली आहे.मुख्यमंत्री हे  'भैय्या भुषण' आहेत अशी टिका मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी व्यक्त केली . 

तर महाराष्ट्र महानच आहे. त्याला महान बनविण्यासाठी आश्रित म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांची गरज नाही असा टोला माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी मारला. 

नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर टिका होत असताना मनसे अधिकृत या ट्‌वीटर आणि फेसबुक हॅंडलवरुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विधान शेअर करण्यात आले आहे.

 भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या ' भाषिक राज्यपुनर्रचना मीमांसा' - वर्षे 1955  या ग्रंथातील मजकूर मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आहे आहेत .

डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ,"मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यासाठी कामगारांचा पुरवठा देखील महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहंजोदडो ऊर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.'' 

 
मुख्यमंत्री  नेमके काय म्हणाले होते ?
 घाटकोपर येथील स्टेशन रोडवरील चौकाचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी आय.डी.सिंह असे नामकरण बुधवारी  करण्यात आले यानिमित्ताने आयोजित  कार्यक्रमात  श्री. फडणवीस बोलत होते.

श्री . फडणवीस यांनी सिंह यांच्या कार्याचा गौरव करताना केलेल्या भाषणातील एक दोन ओळीच दाखविण्यात आल्याने त्याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत . 

मुख्यमंत्री म्हणाले होते , " मराठी संस्कृतीशी एकरूप होऊन उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राच्या वैभवात भरच घातली आहे. त्यामध्ये आय. डी. सिंह यांच्या सारख्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, आय.डी. सिंह यांच्या  प्रयत्नामुळेच आज हिंदी विद्या प्रचार सभेच्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. उत्तर भारतीयांनी मुंबईच्या लौकिकात आपल्या कार्याने भरच घातली आहे. "

" भाषा हे संवादाचे माध्यम असते. मुंबईत मराठी आणि हिंदी भाषिकांच्या संस्कृतीचे उत्तम अभिसरण झाल्याचे आढळते. सण उत्सव या माध्यमातून त्यामध्ये वैविध्यपूर्ण भर पडल्याचे दिसते. त्यामुळे चार पिढ्यांहून अधिक काळ येथे वास्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीयांची पिढी आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com