मनसे चंद्रकांत पाटलांना कोथरूडमध्ये साड्या वाटू देणार नाही 

कोथरूडमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांना साड्या वाटू देणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केले आहे. पाटील यांनी साड्या वाटण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईल प्रत्युत्तर देण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
Chandrakant Patil - MNS Flag
Chandrakant Patil - MNS Flag

पुणे : कोथरूडमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांना साड्या वाटू देणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केले आहे. पाटील यांनी साड्या वाटण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईल प्रत्युत्तर देण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. 

या बाबत मनसेच्या कोथरूड विभागाचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ''कोल्हापूरच्या धर्तीवर येथेही खालच्या पातळीवर राजकारण सुरू झाले आहे, अशी चर्चा कोथरुडच्या जनतेमध्ये आहे. एक तर कोथरूडकरांना गृहीत धरून तुम्ही इथे आलात आणि आता आमचा स्वाभिमान तुम्ही विकत घेऊ पाहत आहात? कोथरूडकर जनतेला आज तुम्ही साड्या वाटणार आणि पाच वर्षे वाटाण्याच्या अक्षदा देणार हे नकळण्या इतके कोथरूडकर सुज्ञ नाहीत असे तुम्हाला वाटते का?
 पाटील यांनी अजून आमदारकीची शप्पथ ही घेतली नाही, ना त्यांना अजून मंत्रीपद मिळाले आहे. आणि या आधीच एक लाख साडी वाटप करणे हा सरळ सरळ आचार संहितेचा भंग आहे.   मतदारांना साड्या वाटून पूर्ण करत आहेत असे दिसते.'' 

मनसे कोथरूड विभागाच्या वतीने ह्या संदर्भात मुख्यनिवडणूक आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच तक्रार देणार आहे, व चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करत त्यांची कोथरूड मधील निवड ही रद्द करावी अशी मागणीही करणार आहोत, असेही धावडे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूडकर जनतेला आवाहन करू इच्छितो की आशा घाणेरड्या वृत्तीचा निषेध करत कोणीही भिकरूपी दिलेली साडी स्वीकारू नये. तसेच असं साडी वाटप करताना कोणीही मनसे च्या निदर्शनात आल्यास मनसे स्टाईल ने ह्या सर्व गैरवरकाराचा विरोध केला जाईल व ह्या सर्व प्रकारची जवाबदारी मनसे ची नसेल असे जाहीर करतो, असेही धावडे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com