मनसे  पदवीधर निवडणुकीसाठी अनुत्सुक; कार्यकर्ते नाराज 

विधानपरिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत छोटे मोठे राजकीय पक्ष दंड थोपटून उतरले आहेत. पण मनसेने मात्र एकाही जागेवर उमेदवारी जाहीर केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
MNS-Raj-Thakre.
MNS-Raj-Thakre.

मुंबई : तरूणांचा राजकीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तरूणाईच्या निवडणुकांमध्ये रसच नसल्याने कार्यकर्त्यांमधूनही नाराजी उमटू लागली आहे.

विधानपरिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत छोटे मोठे राजकीय पक्ष दंड थोपटून उतरले आहेत. पण मनसेने मात्र एकाही जागेवर उमेदवारी जाहीर केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

काही महिन्यांपूर्वी पार पडलेली मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणुकही मनसेने लढविली नव्हती. त्यावेळी सुद्धा निवडणूक लढविण्याबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण खुद्द राज ठाकरे यांनीच निवडणूक लढविणार नसल्याची भूमिका घेतली होती. आताही मुंबई व कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार न उतरविण्याची भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. 

पदवीधर मतदारसंघ, विद्यापीठातील अधिसभा अशा निवडणुकांमध्ये तरूणाई उत्साहाने सहभागी होत असते. त्यामुळे तरूणांचा उत्साह ढवळून काढण्यासाठी व पक्षाला ताकद देण्यासाठी या निवडणुकांमध्ये सहभागी व्हायला हवे. अशा निवडणुकांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारतो. 

मुंबई व कोकणात पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने जवळपास सगळे पक्ष कार्यरत झाले आहेत. पण राज साहेबांनी काहीच भूमिका घेतली नसल्याने आम्हांस शांत राहून इतर पक्षांच्या कामगिरीकडे डोळे लावून पाहावे लागत असल्याची नाराजी मनसेतील सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com