उमेदवारी हुकलेल्या मनसे शहराध्यक्ष अनिल मटालेंचा राजीनामा 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शहरातील तीन व ग्रामीण भागातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे घोषित करण्यात आल्यानंतर इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट राहुल ढिकले यांच्या जागी पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर अशोक मुर्तडक यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या च्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
Nashik MNS Chief Anil Matale Resigns
Nashik MNS Chief Anil Matale Resigns

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शहरातील तीन व ग्रामीण भागातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे घोषित करण्यात आल्यानंतर इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट राहुल ढिकले यांच्या जागी पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर अशोक मुर्तडक यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या च्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. 

ढिकले यांना उमेदवारी न दिल्याने बुधवारी मनसे अंतर्गत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असतानाच आज रात्री उशिरा मनसेचे शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी शहराध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठविला. मटाले यांना पश्चिम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी हवी होती. मात्र शिवसेनेतून राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केलेले दिलीप दातीर यांना आज उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे मटाले हे नाराज होते. 

दोन दिवसापासून त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होते. पक्षाच्या वरिष्ठांकडे त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. आज उशिरा मात्र त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान मटाले यांच्या जागी शहराध्यक्षपदी अंकुश पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. या पूर्वीदेखील मनसेने शहरात दोन अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी प्रयत्न चालवले होते. मटाले यांच्या राजीनामा मागे हेदेखील एक कारण असल्याचे बोलले बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com