MNS Morcha today in Mumbai | Sarkarnama

मुंबईत लाखो मनसे कार्यकर्ते धडकले; मोर्चाला थोड्यात वेळात प्रारंभ

मुरलीधर कराळे
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

पाकिस्तानी व बांगलादेशींना घुसखोरांना हाकलून लावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने आज मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चासाठी लाखो कार्यकर्ते मुंबईत धडकले आहेत

मुंबई : पाकिस्तानी व बांगलादेशींना घुसखोरांना हाकलून लावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने आज मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चासाठी लाखो कार्यकर्ते मुंबईत धडकले आहेत. थोड्याच वेळात मोर्चास सुरूवात होणार असून, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चानंतर सभेला संबोधित करणार आहेत.

मोर्चासाठी आज पहाटेपासून मुंबईत कार्यकर्ते दाखल होण्यास प्रारंभ झाला. आझाद मैदानावर सभा होऊन राज ठाकरे संबोधित करतील. राज्यभरातून आलेल्या लाखो मनसे कार्य़कर्त्यांनी सध्या गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली आहे. विविध घोषणांनी परिसर दणाणून जात आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर हा पहिलाच मोर्चा आहे. मनसेच्या मोर्चाला सरकार घाबरले, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे नोटीसा देऊन आमच्यावर दबावतंत्र करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारीही मनसे पदाधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये महाराष्ट्रीयन कामगारांना कामावर घेतले जात नाही. परप्रांतीय लोक अत्यंत कमी पगारात काम करीत असल्याने कंपनीमालक त्यांना राबवून घेतात. त्यांच्यामुळे मराठी कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीयांना हाकलून लावले पाहिजे, अशा प्रतिक्रीया कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदुंना अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांना मात्र आपण भाई-भाई समजून चांगली वागणूक देत आहोत. असे असताना ते शिरजोर झाले आहेत. त्यामुळे अशा घुसखोरांना त्यांच्या देशाचा रस्ता दाखविलाच पाहिजे, अशाही प्रतिक्रया कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख