mns mocks ram kadam | Sarkarnama

राज यांना सोडून गेलेल्या राम कदमांना मनसेचे फटकारे!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

घाटकोपरः मुंबईतील लोकप्रतिनिधीच्या कामगिरीची लेखा जोखा प्रसिद्ध केलेल्या प्रजा फाउंडेशनच्या सर्वेक्षणात घाटकोपर ( प.) येथील आमदार राम कदम यांचा शेवटून पहिला क्रमांक लागला असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राम कदम यांची सोशल मीडियातुन खिल्ली उडवली आहे.

घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी आमदारांच्या विरोधातील ही संधी न दडवता प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. " पप्पू कान्ट डान्स साला , गोविंदा आला रे आला , पप्पू पुन्हा नापास झाला " या शीर्षकाखाली घाटकोपर परिसरात फलकबाजी करण्यात आली आहे. यात फलकात जगातल्या सर्वात मोठ्या नकली, भंपक गोष्टी करणारे नको ती स्वयंघोषित विश्‍लेषणे लावणारे, असे या फलकांत म्हटले आहे.

या ही वर्षी सुद्धा खालून प्रथम क्रमांक पटकावला या बद्दल राम कदम त्यांचे अभिनंदन !!!
प्रज्ञा फाउंडेशनने प्रामाणिक आणि खऱ्या केलेल्या सर्वेक्षणाबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन!

असे मजकूर असलेला पोस्टर मनसे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी विभागात झळकवले आहेत यासह सर्व प्रकार सोशल मीडियावर दिसत आहे. 

राम कदम हे एकेकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते. २०१४ च्या निवडणुकीत ते मनसे सोडून भाजपत गेले. भाजपमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते विविध माध्यमांत भाजपची बाजू मांडत असतात. त्यांची खिल्ली उडविण्याची संधी मिळाल्यानंतर मनसेने ती पूर्णपणे साधली.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख