महाअधिवेशन मनसेच्या इंजिनात जान आणणार ?

महाअधिवेशन मनसेच्या इंजिनात जान आणणार ?

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन येत्या 23 जानेवारीला मुंबईत होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहुर्त या अधिवेशनासाठी काढण्यात आला असून दोन वर्षानंतर होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची तयारी या निमित्ताने पक्षाने सुरू केली आहे. 

या अधिवेशनाला मुंबईत तब्बल एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मनसेच्या दोन दिवसांच्या शिबीराला आज पुण्यात सुरवात झाली. यावेळी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना ही माहिती दिली. गेल्या दोन महिन्यात राज्यात जे काही सुरू आहे. त्यावर राज्यात मतदार नाराज आहे. हा बिनपैशाचा तमाशा राज्यातील जनतेते पाहिला आहे. या शिबीरात राज्यातील महापालिका असलेल्या शहरातील कार्यकर्ते व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी ठाकरे स्वतंत्रपणे बोलत आहेत. राज्यात सध्या जे काही सुरू आहे. त्याबाबत लोकांच्या मनात नाराजी आहे. अशावेळी लोकांमध्ये जा. त्यांच्या समस्या समजून घ्या, असे यावेळी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

लोकसभा निवडणुका व त्यांनतर विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात समन्वय होता. लोकसभेला राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात राज्यात 10 जाहीर सभा घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज ठाकरे यांनी परस्परांना पूरक भूमिका घेतल्या होत्या. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर जवळीक साधल्याने भविष्यात राष्ट्रवादीबरोबर मनसेचे कितपत सख्य राहील याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर मनसेच्या या महामेळाव्याला विशेष महत्व आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com