MNS meetting in mumbai | Sarkarnama

मनसेच्या चिंतन बैठक नंतर 'चिंतेचे' वळण

सुचिता रहाटे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणावी तशी कामगिरी करता आला नव्हती. तसेच गेल्या काही वर्षामध्ये पक्षाचा आलेख देखील घसरत आहे. त्यामुळे पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत नवे धोरण ठरविण्याच्या उद्देशाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल कृष्णकुंज येथे बैठक पार पडली.

मुंबई - काल झालेल्या मनसेच्या चिंतन बैठकीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांना मध्ये व कार्यकर्त्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. यासंदर्भात मनसे मंडळी खुलेआम चर्चा करीत नसली तरीही त्यांच्यातला रुसवे फुगवे लपून राहिलेले नाहीत. अशावेळी मनसेचे पदाधिकारी सोशल मीडिया वर आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणावी तशी कामगिरी करता आला नव्हती. तसेच गेल्या काही वर्षामध्ये पक्षाचा आलेख देखील घसरत आहे. त्यामुळे पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत नवे धोरण ठरविण्याच्या उद्देशाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल कृष्णकुंज येथे बैठक पार पडली. राज ठाकरे येणाऱ्या काही महिन्यांत राज्याचा दौरा करण्याच्या तयारीत होते.

या सगळ्या बाबी लक्षात घेता पक्षात सकारात्मक बदल होण्याची गरज आहे आणि त्यावर अंमलबजावणी हि झालीच पाहिजे. असे, संदीप देशपांडे व अमेय खोपकर यांनी जाहीररीत्या फेसबुक व ट्विटर वर म्हटले आहे. या गोष्टीला मनसे कार्यकर्ते सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून दुजोरा देताना दिसत आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख