ठाण्यात राज ठाकरे घेणार कार्यकर्त्यांची शाळा

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघात अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवीत सत्ताधाऱ्यांना कडवी लढत देणाऱ्या मनसेला उभारी देण्यासाठी येत्या 9 नोव्हेंबरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठकही राज घेणार आहेत.
Raj Thakrey
Raj Thakrey

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघात अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवीत सत्ताधाऱ्यांना कडवी लढत देणाऱ्या मनसेला उभारी देण्यासाठी येत्या 9 नोव्हेंबरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठकही राज घेणार आहेत. 

ठाण्यात राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी शनिवारी राज ठाकरे आले होते. तेव्हा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बैठकीत ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावादेखील ते घेणार आहेत. राज यांच्या या पुढील भेटीमुळे ठाण्यात यानंतरच्या काळात मनसे अधिक कार्यशील होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दिवाळी सणानिमित्त राज ठाकरे यांनी ठाण्यात राहणारे त्यांचे साडू उन्मेष चव्हाण यांची भेट घेतली. ठाण्यात पाचपाखाडी येथील सेंटर पॉइंट या इमारतीत राज यांचे साडू राहत असून बरेच दिवस भेट न झाल्याने सहपरिवार भेट घ्यायला ठाकरे कुटुंबीय ठाण्यात आले होते. या वेळेस जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अमित ठाकरेंनी लहानपणी केलेली मस्ती याबाबत सांगताना शर्मिला ठाकरे यांना हसू आवरले नाही. साधारण दोन तास ही कौटुंबिक भेट सुरू होती.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आणि महापालिका निवडणुकीविषयी पदाधिकाऱ्यांची पहिलीच बैठक येत्या 9 तारखेला घेणार, अशी माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली. ठाण्यात विधानसभा निवडणुकीत मनसेच्या पारड्यात मतदारांचा वाढलेला टक्का पाहून ठाण्यात मनसेला अधिक ताकद मिळवण्यासाठी राज कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com