इंजिन सोडून नितीन नांदगावकरांनी बांधले शिवबंधन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकरांनी आज मनसेला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर नांदगावकर यानी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. नांदगावकर यांच्यासारखा आक्रमक नेता जाणे हा मनसेसाठी मोठा धक्का आहे.
MNS Leader Nitin Nandgaonkar Enters Shivsena
MNS Leader Nitin Nandgaonkar Enters Shivsena

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकरांनी आज मनसेला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर नांदगावकर यानी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. नांदगावकर यांच्यासारखा आक्रमक नेता जाणे हा मनसेसाठी मोठा धक्का आहे. 

वरुण सरदेसाई आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेच्या दुसऱ्या यादीतही नांव नसल्याने नांदगावकर नाराज झाले होते. या नाराजीतूनच ते शिवसेनेच्या गळाला लागले. नितीन नांदगावकर हे अत्यंत आक्रमक नेते समजले जातात. मुंबईच्या रिक्षा-टॅक्सीचालकांकडून प्रवाशांना होणारा त्रास, पासपोर्टचे गैरव्यवहार, महिलांना होणारा त्रास याबाबत नांदगावकर यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवला. अशा प्रसंगांमध्ये कायदा हातात घेत असल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीसही बजावली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com