मनसेच्या दणक्‍यामुळे कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई  - MNS Kalyan-Dombivali Hawker action | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेच्या दणक्‍यामुळे कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

फेरीवाल्यांविरोधात मनसेने "फेरीवाला हटाव' ही मोहीम हाती घेतली आहे. एलफिन्स्टन रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत रेल्वे प्रशासनासोबत स्टेशन बाहेर बसणाऱ्या फेरीवालेही जबाबदार असल्याने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली.

मुंबई : फेरीवाल्यांविरोधात मनसेने "फेरीवाला हटाव' ही मोहीम हाती घेतली आहे. एलफिन्स्टन रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत रेल्वे प्रशासनासोबत स्टेशन बाहेर बसणाऱ्या फेरीवालेही जबाबदार असल्याने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. मनसेच्या दणक्‍यामुळे शनिवारी कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांनी सकाळी 6 ते रात्री 12 अशा दोन सत्रांत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिका व पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सध्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन अधिकच चिघळत चालले आहे. कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात व पादचारी पुलांवर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिका, पोलीस अधिकारी सकाळ, दुपार व रात्र अशा सत्रांत काम करतील. अनधिकृत फेरीवाल्यांना स्टेशनबाहेर बसण्यास मज्जाव असून साफसफाईवर सुद्धा भर देण्यात येईल. संबधित फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचा दररोजचा गोपनीय अहवाल विशेष कार्य अधिकारी नितीन नार्वेकर व विभागीय आयुक्तांकडे देण्याची जबाबदारीही या पोलीस अधिकाऱ्यांकडे असेल. 

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास व वरील आदेशांचे पालन न केल्यास संबधित अधिकाऱ्यावर शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असे कल्याण-डोंबिवलीचे आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख