मनसेने हिम्मत दाखवत ईडीला नोटीस बजावलीच

mns issues notice to ED on marathi nameplate
mns issues notice to ED on marathi nameplate

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस मिळाली की बऱ्याच नेत्यांना धास्ती भरते. या ईडीच्या विरोधात कोणी फार काही करू शकत नाही. मात्र या ईडीला आपल्या भाषेत नोटीस देण्याची हिम्मत मनसेने अखेर दाखवली. या आधी मराठी एकीकरण समितीने मराठीच्या मुद्यावरून ईडीला नोटीस धाडली होती.

महाराष्ट्रात दुकाने आस्थापना कायदा अंतर्गत नामफलक हे मराठीत असणे अनिवार्य आहे, तसेच राज्यात संघराज्याच्या (भारत सरकार) सर्व कार्यालयाला त्रिभाषा सूत्र नुसार राज्याची स्थानिक भाषा प्रथम ठिकाणी असावे असे आदेश असताना ईडी विभागाकडून या कायद्याचे उल्लंघन झाले आहे. यावर मनसेचे उपाध्यक्ष अरविंद ज्ञा. गावडे यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रार दिली आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालय आणि मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत कळविण्यात आले आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली होती. त्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला. मात्र आंदोलन करण्याचे टाळले. आता ईडीच्या विरोधात त्यांना एक कायदेशीर मुद्दा मिळाला आहे. ते त्याच्यावर काय भूमिका घेणार, हे पाहायला हवे. 

मुंबईत ईडीच्या कार्यालयाचा नामफलक हिंदी आणि इंग्रजीत आहे. शासकीय नियमानुसार स्थानिक भाषेत म्हणजे मराठीतही हा फलक असायला हवा. सर्व शासकीय कार्यालयांना तशी सक्ती आहे. मात्र ईडीने त्याचे सरळसऱळ उल्लंघन केले आहे. तसे न केल्यास दंडाचीही तरतूद आहे.

मराठी एकीकरण समितीने तीन दिवसांपूर्वी याबाबत तक्रार केल्यानंतर ही तक्रार मनसेनेच केली, असा अनेकांचा समज झाला होता. आता मात्र मनसेने अधिकृत भूमिका घेत मनसेला नोटीस दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com