शिवसेनेचा 'संभाजीनगर'चा मुद्दा मनसेकडून हायजॅक

एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने शहरात चाचपणी सुरू केली आहे. शहराच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत गाजणारा औरंगाबादच्या 'संभाजीनगर' नामकरणाचा मुद्दा नेहमीच वापरला गेला. महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेसाठी अडचणीचा ठरलेला संभाजीनगरचा मुद्दा आता मनसेने हायजॅक केला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संभाजीनगर नामकरणासाठी मनसे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
MNS hijacked issue of aurangabad name from SS
MNS hijacked issue of aurangabad name from SS

औरंगाबाद : एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने शहरात चाचपणी सुरू केली आहे. शहराच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत गाजणारा औरंगाबादच्या  'संभाजीनगर' नामकरणाचा  मुद्दा नेहमीच वापरला गेला. महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेसाठी अडचणीचा ठरलेला संभाजीनगरचा मुद्दा आता मनसेने हायजॅक केला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संभाजीनगर  नामकरणासाठी मनसे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

13 तारखेपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर  मनसेचे आमदार  राजू पाटील,  अभिजीत पानसे  यांच्यासह  काही नेते काल औरंगाबादेत दाखल झाले. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची  बैठक घेतल्यानंतर  आज  आमदार राजू पाटील यांनी  पत्रकारांशी बोलताना  औरंगाबादच्या 'संभाजीनगर' नामकरणाचा मुद्दा  उपस्थित केला.

राजू पाटील म्हणाले, की 2014 मध्ये केंद्रात आणि राज्याच्या सत्तेत  शिवसेना सहभागी होती. शहराच्या नामकरणाचा निर्णय केंद्रात होत असल्यामुळे  शिवसेनेने तसा प्रस्ताव  केंद्राकडे देऊन या शहराचे संभाजीनगर असे नामकरण  करून घेणे अपेक्षित होते.  परंतु  केवळ  राजकारणासाठी  याचा वापर  शिवसेनेकडून केला गेला.

आता तर  राज्यात महाविकास आघाडीचे  सरकार आहे.  त्यामुळे शिवसेनेला औरंगाबादचे संभाजीनगर करणे  शक्यच नाही.  गेल्या अनेक वर्षांपासून  रखडलेला हा नामकरणाचा मुद्दा आता  मनसेचे अध्यक्ष  राज साहेब ठाकरे  हेच धसास नेतील असा विश्वासही  राजू पाटील यांनी  प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

एकंदरीत महापालिका निवडणुकीत मनसे संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेची गोची करणार असे दिसते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com