पंढरपुरात परप्रांतियांच्या मदतीला धावली मनसे 

इतर वेळी परप्रांतीयांच्या विरोधात गळा काढणारी मनसे कोरोनाच्या संकटात मात्र याच परप्रांतीयांच्या मदतीला माणूसकीच्या नात्याने धावून आल्याचे सकारात्मक चित्र पंढरपुरात दिसून आले आहे.
mns helps to people of other sates quarantined in pandharpur
mns helps to people of other sates quarantined in pandharpur

पंढरपूर- इतर वेळी परप्रांतीयांच्या विरोधात गळा काढणारी मनसे कोरोनाच्या संकटात मात्र याच परप्रांतीयांच्या मदतीला माणूसकीच्या नात्याने  धावून आल्याचे  सकारात्मक चित्र पंढरपुरात दिसून आले आहे. 

कर्नाटक व आंध्रप्रदेशातील सुमारे 100 हून अधिक परप्रांतीय मजूरांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने टाॅवेल, टूथपेस्ट, ब्रस, अंगाचा साबण, तेल, कपडे धुण्याची पावडर, डासांचा प्रतिबंध करणारी धूप, झाडू, लहान मुलांसाठी बिस्कीट पुडे असे दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे मोफत वाटप करुन माणूसकीचे दर्शन घडवले.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुणे येथून पायी निघालेल्या कर्नाटक, आंध्रप्रेदशातील सुमारे 100 हून अधिक मजूरांना 65 एकर परिसरातील निवारा केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले आहे. येथील मजूरांना प्रशानाच्या वतीने चहा,नाश्ता आणि जेवणाची सोय केली आहे. 

दैनंदिन वस्तूंची गरज ओळखून तहसीलदार डाॅ.वैशाली वाघमारे यांनी सामाजिक व राजकीय संघटनांना  मदतीचे आवाहन केले होते. तहसीलदार डाॅ.वाघमारे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी लागचील मदतीचा हात पुढे केला आहे. 

आज सकाळी सर्व दैनंदिन साहित्याचे वाटप तहसीलदारांच्या उपस्थितीत या गरजू लोकांना करण्यात आले. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, तलाठी श्री. डोरले, राम सुतार, सत्यवान डुबल, समाधान डुबल आदी उपस्थित होते.

मराठी माणसांच्या हक्कासाठी नहेमीच परप्रांतीयांच्या विरोधात लढणारी  मनसे अशा संकटाच्या काळात मात्र माणूसकी हा एकमेव धर्म व प्रांत मानून मदतीसाठी पुढे आल्याने मनसेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com