विधानसभेत मनसेला चांगली संधी : अॅड. प्रकाश आंबेडकर

शरद पवार हे राष्ट्रीय नेते राहिले नसून ते केवळ बारामती पुरते मर्यादित नेते राहिले आहेत. ते भारतीय जनता पक्षाच्या ट्रॅपमध्ये अडकलेले नेते असून, पवार व सत्ताधारी हे दोघेही आरोपींच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. अशोक चव्हाण , अजित पवार , सुनील तटकरे यांच्यावर आरोप असतानाही त्यांना भाजपा सरकारने अटक का केली नाही? अशी जनतेतून मुख्यमंत्र्यांना विचारणा होत आहे. - अॅड. प्रकाश आंबेडकर, संस्थापक,वंचित बहुजन आघाडी
विधानसभेत मनसेला चांगली संधी : अॅड. प्रकाश आंबेडकर

सोलापूर : स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असे  वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगली संधी आहे, असेही ते म्हणाले. 

आघाडीच्या पदाधिकारी बैठकीसाठी ते गुरुवारी सोलापुरात आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.  ते म्हणाले, ''१५३ मतदारसंघांमध्ये मनसे निवडणूक लढवू शकतो. तसा त्यांना स्पेससुद्धा आहे. मनसे हा सेनेला चांगला पर्याय आहे.  राज ठाकरे यांनी याबाबत पुढाकार घेतला पाहिजे. भाजपा - शिवसेना युतीमध्ये या जागा भाजपाकडे जाणार आहेत .  राज ठाकरे हे हुशार राजकारणी आहेत. सत्तेच्या नादात  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या संघटनांचे   विसंघटन झालं आहे . पुन्हा संघटन उभे  करायचे  असेल तर दोघांनी वेगवेगळे लढले  पाहिजे."

ते पुढे म्हणाले, "दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष व त्यांची लीडरशिप ही डेडएंड ला आली आहे. संघटनही संपलं आहे. ईव्हीएम बाबतचा संशय मी पहिल्यापासून व्यक्त करीत होतो मात्र लोकांनी त्यावेळी हसण्यावर नेले. पण आता हा आरोप खरा ठरत आहे. उद्या (शुक्रवारी) मुंबईत होणाऱ्या पत्रकार परिषदेत मी यावर तांत्रिक माहितीसह काही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. मुस्लिम समाज हा देव मानत नाही तरीदेखील सोलापुरात मुस्लिम मोहल्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान झालं हेच संशयास्पद आहे." मुस्लिमांनी अपेक्षेप्रमाणे बहुजन वंचित आघाडीला पाठिंबा दिला नाही , पण जर पाठिंबा दिला तर बहुजन आणि मुस्लिम या दोघांची मिळून  मतांची आघाडी तीस टक्के पर्यंत जाईल असेही आंबेडकर म्हणाले. सोलापूर मतदारसंघात अगदी शेवटच्या क्षणी  मुस्लिम समाज वंचित पासून दुरावला शिवाय मौलवींनी फतवे काढले हे त्याचं कारण आहे, असेही आंबेडकर म्हणाले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com