mns an ghanekar movie | Sarkarnama

मनसेच्या दणक्‍याने मल्टीफ्लेक्‍सचालक नरमले, "घाणेकर' ला प्राईम टाईम

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

ठाणे : प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याची प्रमुख भूमिका असलेला आणि अभिजित देशपांडे दिग्दर्शित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला कल्याण येथील मल्टीफ्लेक्‍स चालकांनी प्राईम टाईम देण्यास आता होकार दिला आहे. आधी या चित्रपटाला प्राईम टाईम देण्यास नकार दिला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट आघाडीच्यावतीने अमेय खोपकर यांनी या मल्टीफ्लेक्‍स चालकांना निर्वाणीचा इशारा दिला होता. आता या चित्रपटाचे चार शो लावण्याची तयारी मल्टीफ्लेक्‍सचालकांनी दाखविली आहे. तसे लेखी आश्‍वासनही मनसेला देण्यात आले 

हा चित्रपट सध्या बॉक्‍सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, या चित्रपटासाठी प्राईम टाईम न दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली होती. कल्याणमधील मल्टिप्लेक्‍स चालकांविरोधात मनसेने आपल्या पद्धतीने कारवाई करण्याचा इशारा दिला होता. प्राईम टाईम म्हणजेच संध्याकाळच्या वेळेतील शो न दिल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

प्रसिद्ध अभिनेता अमिरखान याच्या "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या हिंदी चित्रपटाच्या स्पर्धेत "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ' हा चित्रपट गर्दी खेचत आहे मात्र नेहमीच मराठी चित्रपटाबद्दल दुजाभाव बाळगणाऱ्या मल्टीफ्लेक्‍स चालकांनी हा मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवायाला नकार दिला होता. त्यानंतर मग मनसेनं यात लक्ष घातले. 

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 8 नोव्हेंबरला रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सगळीकडे या चित्रपटाचे कौतुक होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख