औरंगाबादेतील पहिल्या कोरोनाबाधित महिलेला बरे करणारे डॉ. वरुण गवळी यांचा 'मनसे' सन्मान

गेल्या महिन्यात औरंगाबादेत पहिली कोरोनाबाधित महिला आढळून आली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली, पण या महिलेवर योग्य उपचार करून तिला पूर्णपणे बरी करण्यात मोलाचा वाटा असणारे डॉ. वरुण गवळी यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने योग्य सन्मान करण्यात आला
MNS Felicitated Doctor Who Treated First Corona Patient
MNS Felicitated Doctor Who Treated First Corona Patient

औरंगाबाद: गेल्या महिन्यात औरंगाबादेत पहिली कोरोनाबाधित महिला आढळून आली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली, पण या महिलेवर योग्य उपचार करून तिला पूर्णपणे बरी करण्यात मोलाचा वाटा असणारे डॉ. वरुण गवळी यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने योग्य सन्मान करण्यात आला. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी डॉ. वरुण गवळी यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहराला व जिल्ह्याला कोरोनाच्या मोठ्या संकटातून मुक्त केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.

औरंगाबादमधील खाजगी रुग्णालयात औषधोपचाराणे कोरोनामुक्त झालेली शहरातील एकमेव महिला रुग्ण तब्बल ११ व्या दिवशी स्वगृही परतली. 'थँक्यू वेरी मच"असे म्हणत त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पूर्णपणे कोरोणामुक्त होऊन घरी जाणाऱ्या त्या मराठवाड्यातील पहिल्याच रुग्ण ठरल्या.आणि ही विशेष कामगिरी पार पडली ती याच रुग्णालयातील डॉ. वरुण गवळी यांनी.

सलग १० दिवस जीवाचेरान करून डॉ.गवळी यांनी त्या महिलेला कोरोनमुक्त केले. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वनुसार उपचार करण्यात आले व सदर महिला कोरोनामुक्त झाली. म्हणूनच समाजात डॉक्टर म्हणजेच देवदूत असे म्हटले जाते.

याचाच एक अभिमान बाळगून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डॉ. वरुण गवळी यांचा जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या हस्ते विशेष कामगिरी केल्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ''खरंच आज डॉ गवळी यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आज आपल्या सारख्या दिवस रात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर व तुमच्या सहकाऱ्यांमुळेच औरंगाबाद, महाराष्ट्र व देश कोरोनाच्या संकटाचा खंबीरपणे मुकाबला करतोय,'' असे कृतज्ञ भाव देखील  दाशरथे यांनी व्यक्त केले. कोरोना विरोधातील लढ्यात मनसे सदैव आपल्या सोबत असल्याचा विश्वासही मनसेच्या वतीने डॉ. गवळी यांना देण्यात आला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com