MNS displays posters ; call sanjay nirupam a dog | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

 मनसेची पोस्टरबाजी :  संजय निरुपम परप्रांतीय भटका कुत्रा !

सरकारनामा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असून, केवळ परप्रांतीय मतांवर डोळा ठेवत ते अशी विधाने करत आहेत, अशी पोस्टरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर पोस्टर्सच्या माध्यमातून आक्रमक हल्ला  चढवला आहे . संजय निरुपम यांना भटक्या कुत्र्याची उपमा देत तसे दर्शविणारे पोस्टर्स मनसेने मुंबईत लावले आहेत . 
संजय निरूपमांना  पोस्टरवर कुत्र्याच्या रूपात दाखवण्यात आले असून गळ्यात काँग्रेसचा पट्टाही दाखविण्यात आला आहे. एका बादलीत हाडांचा ढीग दाखविण्यात आला असून ही ही परप्रांतीय  मतांची हाडके चघळण्यासाठी आसुसलेल्या  कुत्र्याचे रूपकही संजय निरुपम यांच्यासाठी वापरण्यात आले आहे . 

 ' उत्तर भारतीय लोक मुंबई आणि महाराष्ट्राचा गाडा चालवतात, त्यामुळे त्यांनी मनात आणले तर महाराष्ट्र ठप्प होईल,' असे वक्तव्य करणारे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असून, केवळ परप्रांतीय मतांवर डोळा ठेवत ते अशी विधाने करत आहेत, अशी पोस्टरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे.

नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी उत्तर भारतीय लोक मुंबई चालवतात त्यांनी मनात आणले तर महाराष्ट्र ठप्प होईल. उत्तर भारतीय लोक राज्यातील सर्वच क्षेत्रात सक्रिय असल्याने हेच लोक मुंबई चालवतात, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार मनसेने घेतला आहे. या वक्तव्याविरोधात त्यांनी समाज माध्यमांवर निरुपम यांचे पोस्टर व्हायरल केले आहे. संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख