नाशिक महापौर निवडणुकीत हुकुमाचा एक्का राज ठाकरेंच्या हाती

नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे दहा नगरसेवकांत फाटाफुटीची चिन्हे आहेत. दुसरीकडे सर्व विरोधक भाजप विरोधात एकवटण्याची प्रक्रीया सुरु आहे. बहुमताची संख्या गाठण्यासाठी यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक अत्यंत महत्वाचे आहेत. या नगरसेवकांत दोन मतप्रवाह आहेत. मात्र, अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेणार आहेत.
Raj Thakrey will Play Major role in Nahshik Mayor Election
Raj Thakrey will Play Major role in Nahshik Mayor Election

नाशिक : नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे दहा नगरसेवकांत फाटाफुटीची चिन्हे आहेत. दुसरीकडे सर्व विरोधक भाजप विरोधात एकवटण्याची प्रक्रीया सुरु आहे. बहुमताची संख्या गाठण्यासाठी यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक अत्यंत महत्वाचे आहेत. या नगरसेवकांत दोन मतप्रवाह आहेत. मात्र, अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे नगरसेवक व त्यांचे नेते कितीही धावाधाव करीत असले तरीही महापौर पदाचा डाव जिंकण्यासाठी हुकुमाचा एक्का राज ठाकरे यांच्या हातीच आहे.

महापालिकेत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेनेदेखील बाह्या सरसावल्या आहेत. सर्वच पक्ष नगरसेवकांना सुरक्षित स्थळी नेणार आहेत. सोमवारी सर्व नगरसेवक स्वतंत्ररित्या सहलीला रवाना होतील. भाजपचे नगरसेवक फुटत असल्याचे चित्र दिसत असले तरी सत्तास्थापनेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन भाजपनेही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेचे नगरसेवक गळाला लावले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

विभागीय आयुक्तांकडे एकत्रित गटनोंदणी केलेल्या अपक्ष नगरसेवकांवर जाळे टाकण्यात आले आहे. अपक्षांना सत्तेत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. महाआघाडी होत असली तरी पक्षश्रेष्ठींना विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेतला जाणार नाही. महाशिवआघाडीत सहभागी होताना गृहीत धरले जाऊ नये व मोठे पद पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्ष उत्सुक आहे. महाशिवआघाडीचा निर्णय झाला नसला तरी महापालिकेत चमत्कार नक्की घडेल, असा विश्‍वास मनसे, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला.

भाजप विरोधात शिवसेनेसह सर्व पक्षांनी एकत्रीत उमेदवार व जमवा जमव सुरु केली आहे. "मनसे'ने याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. दोन दिवसांनी पक्षप्रमुख राज ठाकरे याबाबत जो निर्णय देतील त्यानुसार आम्ही सर्व नगरसेवक कार्यवाही करु - अशोक मुर्तडक, माजी महापौर, मनसे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com