MNS Chief Raj Thakrey on Ram Mandir Verdict | Sarkarnama

आज बाळासाहेब असायला हवे होते : राज ठाकरे

अमोल कविटकर
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पुणे : ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अतिशय आनंद झाला. शहीद कारसेवकांच्या बलिदानाला न्याय मिळणार का? हा जो इतकी वर्ष प्रश्न होता तो निकाली लागला,'' असे सांगत ''आज बाळासाहेब असायला हवे होते,'' अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केली. 

सर्वोच्च न्यायालयाने राममंदीराबाबत दिलेल्या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले, ''आता लवकरात लवकर मंदीर उभं राहाव .  राम मंदिर उभं राहील, त्याबरोबर या देशाची अपेक्षा आहे की राम राज्य यावं. खऱ्या अर्थाने राम राज्याची होती, बघू काय होतंय ते.  पण आजच्या निर्णयातून एक गोष्ट सर्वात जास्त जाणवली, आज बाळासाहेब असायला पाहिजे होते, निर्णय ऐकून त्यांना मनापासून आनंद झाला असता. ज्याच्यासाठी इतकी वर्ष संघर्ष झाला त्याचं चीज झालं . सुप्रीम कोर्टाला धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. लवकरात लवकर राम मंदीर व्हावं, हीच इच्छा आहे,"

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख