महाराष्ट्ररुपी वाघ घेतो आहे युतीचा घास; राज ठाकरेंचे जुने व्यंग्यचित्र पुन्हा व्हायरल

राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. एकेकाळी मित्र असलेले शिवसेना-भाजप यांनी आता एकमेकांकडे पाठ फिरवली आहे. शिवसेना आता आपले एकेकाळचे विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे चकरा मारु लागली आहे. दुसरीकडे 'पुन्हा येणार' सांगणारा भारतीय जनता पक्ष मात्र मौन बाळगून आहे. काही प्रमाणात माध्यमांतूनही भाजप बाजूला पडल्याचे चित्र आहे. त्याच वेळी राज यांचे एक जुने व्यंग्यचित्र व्हायरल होऊ लागले आहे.
MNS Chief Raj Thakrey Old Cartoon getting Viral Again
MNS Chief Raj Thakrey Old Cartoon getting Viral Again

मुंबई : राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. एकेकाळी मित्र असलेले शिवसेना-भाजप यांनी आता एकमेकांकडे पाठ फिरवली आहे. शिवसेना आता आपले एकेकाळचे विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे चकरा मारु लागली आहे. दुसरीकडे 'पुन्हा येणार' सांगणारा भारतीय जनता पक्ष मात्र मौन बाळगून आहे. काही प्रमाणात माध्यमांतूनही भाजप बाजूला पडल्याचे चित्र आहे. त्याच वेळी राज यांचे एक जुने व्यंग्यचित्र व्हायरल होऊ लागले आहे. 

गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी भाजपवर आपल्या व्यंग्यचित्राच्या माध्यमातून अणकुचीदार तीर सोडला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात नरभक्षक बनलेल्या 'अवनी' वाघीणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. त्यावेळी वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार व भाजपवर जोरदार टीकाही झाली होती. त्याचाच संदर्भ राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात घेतला होता. 

या व्यंग्यचित्रात एका भागात २०१८ मध्ये युती सरकार व वनमंत्री अवनी वाघीणीला गोळ्या घालत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. त्यांच्या हाती असलेल्या बंदुकीवर 'माज' असे लिहिण्यात आले आहे. याच व्यंग्यचित्राच्या दुसऱ्या भागात महाराष्ट्ररुपी वाघ युतीचा घास घेताना दाखवला आहे. राज यांनी गेल्या वर्षी काढलेले हे बोलके व्यंग्यचित्र आता पुन्हा एकदा व्हायरल व्हायला लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com