MNS Chief Raj Thackeray Suffering From Tennis Elbow | Sarkarnama

राज ठाकरे यांना होतो आहे 'टेनिस एल्बो'चा त्रास

सागर आव्हाड
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसून येते आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टेनिस एल्बो झाला आहे.आज पुण्यात एका खासगी कार्यक्रमला राज ठाकरे आले होते .कटारिया शाळेतील मैदानावर त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यावेळी त्यांच्या हाताला बँडेज पाहायला मिळालं. गेल्या आठवड्यापासून राज ठाकरे यांना 'टेनिस एल्बो' चा त्रास होत असल्याचे समजते.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसून येते आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टेनिस एल्बो झाला आहे.आज पुण्यात एका खासगी कार्यक्रमला राज ठाकरे आले होते .कटारिया शाळेतील मैदानावर त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यावेळी त्यांच्या हाताला बँडेज पाहायला मिळालं. गेल्या आठवड्यापासून राज ठाकरे यांना 'टेनिस एल्बो' चा त्रास होत असल्याचे समजते.

टेनिस एलबो या आजार हाताच्या  कोपराला होत असतो, यापूर्वी सचिन तेंडुलकर यांना ही या आजार झाला होता 
टेनिस एल्बो म्हणजे काय - आपल्या कोपरापासून महत्त्वाचे स्नायू दंडाच्या दिशेने गेलेले असतात. स्नायूंचा एक संच मनगट उचलण्याचं काम करत असतो. स्नायूंचा उगम कोपराच्या बाह्य दिशेला असतो. हा स्नायूंचा संच उगमस्थानी सुजला तर मनगट उचलण्यासाठी जराशीही हालचाल करणं वेदना देणारं ठरतं. कपडे पिळणं, दरवाजा उघडणं किंवा दरवाजाचा नॉब फिरवणं या साध्या हालचालींमध्येही वेदना होतात. कधी-कधी साध्या हस्तांदोलनामुळेही कळ येऊ शकते. टेनिस किंवा बॅडमिंटन खेळ सातत्याने खेळणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. याच त्रासाला टेनिस एल्बो असं म्हणतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख