मनसेकडून औरंगाबादमध्ये शिवजयंती तिथीनुसार साजरी होणार ...

नव्यानेच जबाबदारी मिळालेले पदाधिकारी जोमाने कामाला लागले असून 12 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत मनसे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडणार असल्याचे समजते. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर 12 मार्च रोजी मनसेचे मराठवाडा संपर्कप्रमुख जावेद शेख यांच्यासह मुंबईतील मनसेचे नेते शहरात दाखल होणार आहेत. एकंदरित मनसे या महापालिका निवडणुकीत चांगलाच जोर लावणार असे दिसते.
मनसेकडून औरंगाबादमध्ये शिवजयंती तिथीनुसार साजरी होणार ...

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महराष्ट्र नवनिर्माण सेना 12 मार्च रोजी औरंगाबादेत तिथीनूसार शिवजयंती साजरी करणार आहे. याची पूर्वतयारी जोरात सुरू असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक या निमित्ताने आज घेण्यात आली. शहर-जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शिवजयंतीचे नियोजन ठरवण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत एन्ट्री करायचीच असा निर्धार मनसैनिकांनी केल्याचे दिसते. 

सुहास दाशरथे, हर्षवर्धन जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर काल सुमीत खांबेकर यांच्यावर राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघटनात्मक बांधणी आणि पदांचे वाटप केल्यानंतर आता मनसेने आपले लक्ष 12 मार्च रोजीच्या शिवजयंतीवर केंद्रीत केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात एक राजा एक जयंती असे धोरण राबवत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा आग्रह आणि अंमलबजावणी करणाऱ्या शिवसेनेने महाविकास आघाडी सोबत गेल्यानंतर तिथीचा आग्रह सोडला आणि 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी केली. नेमका मनसेने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. 

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. लोकसभा निवडणुकीत जरी शिवसेनेचा पराभव झाला असला तरी त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यातील सर्वच आमदार निवडून आणत या पराभवाचा वचपा काढला. परंतु राज्यातील बदलत्या समीकरणात शिवसेना महाविकास आघाडी सोबत गेली आणि प्रखर हिंदुत्व, संभाजीगरचे नामकरण, राम मंदीर, एनआरसी, सीएए आदी विषयावर पक्षाने मवाळ धोरण स्वीकारले. नेमक्‍या याच कारणांवरून शिवसेनेची कोंडी करायची आणि महापालिका निवडणुकीत मुसंडी मारायची अशी खेळी मनसेकडून केली जात आहे. 

राज ठाकरेंकडून तिथीचा आग्रह 
गेल्या महिन्यात राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. तत्पुर्वी राज ठाकरे यांनी पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली होती. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय या भेटीनंतरच घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, औरंगाबादचा दौरा संपवून मुंबईत परतल्यानंतर काही दिवसांनीच मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना 12 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळवण्यात आले होते. एवढेच नाही तर स्वःत राज ठाकरे औरंगाबादेत येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com