शिवसेनेच्या पाठोपाठ 'मनसे'चे नेतेही 'राष्ट्रवादी' च्या बाळासाहेब सानपांच्या दरबारी

तिकिट कापल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार बनलेले भाजप आमदार बाळासाहेब सानप यांनी नाट्यमयरित्या शिवसेना संपर्क नेते संजय राऊत यांनी दिलेला आशिर्वाद चर्चत असताना, रविवारी दुपारी अचानक मनसेचे पदाधिकारी नाशिक मध्यमधील उमेदवार नितीन भोसले यांच्यासह बैठकीसाठी आल्यामुळे राजकीय वातावरण तप्त झाले. सानप यांच्या कार्यालयात जवळपास पंधरा ते वीस मिनिटे मनसे व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी गुप्तगू केले.
MNS Candidate Meets NCP Balasaheb Sanap
MNS Candidate Meets NCP Balasaheb Sanap

नाशिक : तिकिट कापल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार बनलेले भाजप आमदार बाळासाहेब सानप यांनी नाट्यमयरित्या शिवसेना संपर्क नेते संजय राऊत यांनी दिलेला आशिर्वाद चर्चत असताना, रविवारी दुपारी अचानक मनसेचे पदाधिकारी नाशिक मध्यमधील उमेदवार नितीन भोसले यांच्यासह बैठकीसाठी आल्यामुळे राजकीय वातावरण तप्त झाले. सानप यांच्या कार्यालयात जवळपास पंधरा ते वीस मिनिटे मनसे व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी गुप्तगू केले. दरम्यान, या चर्चमुळे दोन्ही मतदारसंघात उमेदवार देणाऱ्या कॉंग्रेसची अस्वस्थता वाढली आहे.

राज्यभरात भाजप व शिवसेनेचे ताणलेले संबंध तसेच नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेने बंडाचे निशाण फडकावून भाजप आमदार सीमा हिरे यांची अडचण केली असताना, ऑक्‍टोंबर रोजी चक्क संपर्कनेते संजय राऊत यांची कार्यालयाजवळून जात असल्याचे निमित्त साधून सानप यांच्याशी झालेली बाब चर्चचा विषय ठरली होती. शिवसेनेकडून भाजपाला संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र असताना, रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मनसेचे माजी आमदार भोसले, प्रदेश पदाधिकारी डॉ प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, अनंता सुर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी सानप यांच्या कृष्णनगर कार्यालयाला भेट दिली. 

यावेळी सानप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे आदी उपस्थित होते. नाशिक पूर्वमध्ये मनसेचा उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादीला मदत करा व त्याबदल्यात नाशिक मध्यमध्ये राष्ट्रवादीने मनसेला मदत करावी, अशी चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com