MNS Candidate From Nashik East Withdraws Nomination | Sarkarnama

मनसेचे अशोक मुर्तडकांच्या माघारीने 'राष्ट्रवादी'च्या बाळासाहेब सानपांना बळ (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांतील चर्चेनंतर नाशिक पूर्व मतदारसंघातील 'मनसे'चे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी आज माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब सानप यांची निवडणूक सोपी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे राहुल ढिकले यांना सोपी वाटणाऱ्या लढतीचे चित्र आज माघारीच्या दिवशी अटीतटीचे बनले आहे.

नाशिक : पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांतील चर्चेनंतर नाशिक पूर्व मतदारसंघातील 'मनसे'चे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी आज माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब सानप यांची निवडणूक सोपी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे राहुल ढिकले यांना सोपी वाटणाऱ्या लढतीचे चित्र आज माघारीच्या दिवशी अटीतटीचे बनले आहे.

शिवसेना, भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवाराविरोधीत मतविभागणी टाळण्यासाठी गेले दोन दिवस चर्चा सुरु होती. यासंदर्भात काल सायंकाळी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांत चर्चा झाली होती. पुण्यात कोथरुड मतदारसंघात भाजपचे प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेच्या उमेदवाराला दोन्ही कॉंग्रेसने पाठींबा देऊन सरळ लढत निर्माण केली होती. ते सूत्र लक्षात घेऊन नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपला आव्हान देण्यासाठी नवी राजकीय समिकरणे निर्माण झाली. 

हे देखिल वाचा - राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेमुळे उद्धव ठाकरेंची सभा स्थगित

भाजपने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी न देता मनसेचे राहूल ढिकले यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या सानप यांच्यावर उमेदवारीसाठी दबाव होता. त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मनसेचे माजी महापौर अशोक मुर्डक यांनी माघार घेतल्याने आता पूर्व मतदारसंघा भाजपला एकास एक लढत द्यावी लागेल. त्यात ही निवडणूक शेवटच्या क्षणी चुरशीची झाली आहे. आमदार सानप यांचा मोठा संपर्क आहे. गेल्या पाच वर्षात त्यांची विकासकामे तसेच महापालिकेतील नगरसेवकांचा एक मोठा गट त्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे भाजपला अंतर्गत बंडाळीचा धोका निर्माण झाला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख