येवल्यात छगन भुजबळांविरोधात मनसे एबी फाॅर्म अभावी रिंगणाबाहेर!

येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणारे नरसिंग दरेकर यांच्या उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यांना वेळेत पक्षाकडून एबी मिळू शकला नसल्याचे सांगण्यात येते.
Chagan Bhujbal
Chagan Bhujbal

येवला  : येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणारे नरसिंग दरेकर यांच्या उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी  फॉर्म जोडला नसल्याने, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यांना वेळेत पक्षाकडून एबी मिळू शकला नसल्याचे सांगण्यात येते.

तसेच सौ. शेफाली समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु छगन भुजबळ हे पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याने, सौ.शेफाली भुजबळ यांच्या उमेदवारी अर्जाला AB फॉर्म नसल्याने बाद करण्यात आला आहे. आता १४ जणांचे २१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. या मतदारसंघात आता छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडी), संभाजी पवार (शिवसेना, भाजप युती) यांच्यात सरळ सामना असेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com