हर्षवर्धन जाधव, दाशरथे मनसेचे नवे जिल्हाध्यक्ष 

...
हर्षवर्धन जाधव, दाशरथे मनसेचे नवे जिल्हाध्यक्ष 

औरंगाबाद : शिवसेनेतून नुकतेच मनसेमध्ये प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसोबतच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे . विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून शहराध्यक्ष असलेले सुमित खांबेकर यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे .

संघटनात्मक बांधणी आणि आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले .महापालिका निवडणुकीत दमदार कामगिरी करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी सुहास दशरथे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी यानिमित्ताने सोपवल्याचे दिसून येते .

सुहास दाशरथे यांच्याकडे औरंगाबाद शहरातील तीन विधानसभा मतदारसंघा सोबतच ग्रामीण मधील वैजापूर आणि गंगापूर या दोन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून सोपवण्यात आली आहे.  तर हर्षवर्धन जाधव यांच्याकडे कन्नड सोयगाव आणि सिल्लोड या तीन विधानसभा मतदार संघाची शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

राज ठाकरे  यांनी नुकताच औरंगाबाद दौरा केला होता .या दौऱ्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि बैठका घेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. याशिवाय पक्ष विरोधात प्रसार माध्यमांना चुकीच्या बातम्या पुरवणाऱ्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना दूर करण्याचा इशाराही  राज ठाकरे यांनी दिला होता. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातून कोणाची हकालपट्टी करण्यात आली नसली तरी काहींची पदांवरून उचलबांगडी करण्यात आली आहे.  अनेक वर्षापासून शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सुमित खांबेकर यांना या पदावरून हटविण्यात आले आहे, ही जबाबदारी आता नव्यानेच पक्षात आलेले सुहास दशरथे यांच्यावर सोपवण्यात आली आहे .एकंदरीत राज ठाकरे यांनी औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटनेत मोठे फेरबदल करत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सूचक इशारा दिल्याचे यावरून दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com