mns and star campaigner | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

मनसेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत राज ठाकरेंसह 19 जण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे : राज्याच्या विधीमंडळात सत्तेच्या नव्हे तर विरोधी बाकांवर बसविण्याचे आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज यांच्यासोबतच यांच्यासह 19 जणांची टीम प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. निवडणुकीच्या रगांगणात 104 उमेदवार उतरवून मनसे आता विरोधी पक्ष म्हणूून कामगिरी बजाविण्याच्या प्रयत्नात आहे. 

पुणे : राज्याच्या विधीमंडळात सत्तेच्या नव्हे तर विरोधी बाकांवर बसविण्याचे आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज यांच्यासोबतच यांच्यासह 19 जणांची टीम प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. निवडणुकीच्या रगांगणात 104 उमेदवार उतरवून मनसे आता विरोधी पक्ष म्हणूून कामगिरी बजाविण्याच्या प्रयत्नात आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात स्टार प्रचारकांमध्ये बाळा नांदगावकर, दीपक पायगुडे, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, संजय चित्रे, जयप्रकाश बाविस्कर, अनिल शिदोरे, प्रमोद पाटील, अभिजीत पानसे, मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, परशुराम उपरकर, हेमंत गडकरी, बाबा जाधवराव, राजा चौगुले, संदीप देशपांडे, रिटा गुप्ता यांचा समावेश आहे. 

मनसेच्या वतीने पुणे शहरात पाच आणि जिल्ह्यात दोन असे एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात कसबा मतदारसंघातून अजय शिंदे, शिवाजीनगर येथून सुहास निम्हण, कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून वसंत मोरे, पुणे कॅन्टोन्मेंटमधून मनीषा सरोदे निवडणूक लढवीत आहेत. तर, ग्रामीणमध्ये शिरूर मतदारसंघातून कैलास नरके आणि भोरमधून अनिल मातेरे निवडणूक लढवीत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्यासह शालिनी ठाकरे, पायगुडे, शिदोरे यांच्यासह इतर नेते सभा घेणार आहेत. 

ठाकरेंच्या सभेसाठी मैदानाचा शोध 
राज ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वीची पुण्यातील सभा पावसामुळे रद्द झाली. ही सभा पुन्हा सोमवारी (ता. 14) घेण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. मंडई येथे सभा घेण्यासाठी महापालिका आणि वाहतूक विभागाकडे परवानगी मागितली आहे. परंतु अद्याप ती मिळालेली नाही, असे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख