मनसेला राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय...

मनसेला राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय...

पुणे : विधानसभा निवडणुका लढवाव्यात की नको या संभ्रमात अडकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने तिसऱ्या आघाडीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. माजी खासदार शेट्टी यांच्या पुढाकाराने पुण्यात सुमारे सोळा छोट्या-मोठ्या संघटनांची बैठक आज पुण्यात झाली. या बैठकीत तिसरी आघाडी स्थापन करायची की कॉंग्रेस आघाडीसोबत जायचा याची चर्चा करण्यात आली. मनसेला कॉंग्रेस आघाडीत घेण्यास कॉंग्रेसचा नकार आहे. या पार्श्‍वभूमीवर तिसरी स्थापन झाली तर मनसेसमोर एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. 

मनसेची कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी होणार का ? आघाडी झाली नाही तर मनसे स्वतंत्र लढणार का ? याबाबत कोणतीच स्पष्टता कार्यकर्त्यांपर्यंत पोचलेली नाही. त्यामुळे पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. येत्या आठ दिवसात आचारसंहिता लागू होईल. मात्र, पक्षाचे नेमके धोरण अद्याप स्पष्ट झालेले नाही. " ईव्हीएम' ला विरोध करण्यासाठी निवडणूक न लढविण्याचा विचार सुरवातीला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलून दाखविला होता. 

मात्र, त्याला राज्यातील तसेच देशातील इतर पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी मनसेने ही भूमिका मागे घेतली. गेल्या काही दिवसांपासून पक्ष पातळीवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. मात्र, कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडीत सहभागी होण्याबाबत संभ्रम कायम आहे. मनसेला आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी अनुकूल आहे. मात्र, कॉंग्रेसचा विरोध असल्याने अद्याप तरी मनसे आघाडीत सहभागी होऊ शकली नाही. या परिस्थिती मनसे स्वतंत्र लढणार का ? लढली तर किती जागांवर उमेदवार उभे करणार ? या बाबत पक्ष नेतृत्वाने कोणतीच भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. 

माजी खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यामुळे आज होत असलेल्या बैठकीत तिसरी आघाडी करण्याचा निर्णय झाला तर या आघाडीत मनसेला सामावून घेण्याबाबत विचार होऊ शकतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com