शेतकऱ्यांना शहरात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आता मनसे रस्त्यावर...

शेतकऱ्यांना शहरात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आता मनसे रस्त्यावर...

मुंबई : "खळखट्ट्याक'साठी ओळख असणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा उत्पादनांना शहरात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात हे आंदोलन केले जाणार असून ठाण्यामध्ये उद्या (17 मे) पहिले आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला शहरात चांगला भाव मिळत असल्याने सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळवून देण्यासाठी मनसेने हे आंदोलन छेडणार आहे. उद्या दुपारी ठाण्यातील गावदेवी मैदानापासून महानगरपालिकेवर मनसेतर्फे शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे, एकट्याने किंवा सामूहिकपणे उत्पादित केलेला माल विकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य करणे आवश्‍यक आहे. यामुळे काही शेतकऱ्यांना तरी दिलासा मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्‍त केली आहे. तसेच शहरामध्ये सध्या भाजीपाला विकण्यासाठी घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जातो. त्यांच्याकडून हफ्ते वसूल केले जात असल्याने त्यांची पिळवणूक केली जात आहे. हफ्ता दिल्याशिवाय ते धंदाच करू शकत नसल्याबाबत राज ठाकरेंनी उद्‌वेग व्यक्‍त केला आहे. 

ठाण्यामध्ये तर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक गुंड प्रशासनावर दबाव आणत शेतकऱ्यांना हुसकावून लावले जात असल्याचा गंभीर आरोपही या पत्रकात राज ठाकरे यांनी केला आहे. ठाण्यामध्ये रत्नागिरीचा एक शेतकरी तीन वर्षापासून नौपाडा विभागामध्ये आंबे विकण्यासाठी येत असे. या शेतकऱ्याला भाजपचे दहा नगरसेवक, एक जिल्हाध्यक्ष येवून या शेतकऱ्याला हटविण्यासाठी ताकद लावत आहेत. या शेतकऱ्याचे वर्षाचे लाखो रूपयांचे नुकसान होत असल्याने या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याच्या निमित्ताने मनसे रस्त्यावर उतरणार आहे. अशा प्रकारची आंदोलन मनसेकडून संपूर्ण राज्यात केली जाणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com