हर्षवर्धन जाधव, दाशरथे आणि महाजन यांचा " मनसे' मध्ये प्रवेश

औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सह संपर्क प्रमुख सुहास दाशरथे यांचा शिवसेनेच प्रवेश हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सकाळी अकरा वाजता "कृष्णकुंज' वर हा पक्षप्रवेश झाला. सुहास दाशरथे हे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. गेल्या 38 वर्षांपासून दाशरथे हे शिवसेनेत विविध शाखा प्रमुख,विभाग प्रमुख, शहर प्रमुख, व आता लोकसभा सहसंपर्क प्रमुख पदावर कार्यरत आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात.
 हर्षवर्धन जाधव, दाशरथे आणि महाजन यांचा " मनसे' मध्ये प्रवेश

औरंगाबाद : औरंगाबाद आणि परिसरात गेले काही दिवस ज्याची चर्चा सुरू होती ते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसेमध्ये प्रवेश केला. याआधी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घएतली तेव्हाच त्यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत मिळाले होते. जाधव यांच्याबरोबरच आज शिवसेनेचे पदाधिकारी सुहास दाशरथे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. ,प्रकाश महाजन व दिलीप बनकर यांनीही या पक्षात प्रवेश केला आहे. 

औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सह संपर्क प्रमुख सुहास दाशरथे यांचा शिवसेनेच प्रवेश हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सकाळी अकरा वाजता "कृष्णकुंज' वर हा पक्षप्रवेश झाला. सुहास दाशरथे हे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. गेल्या 38 वर्षांपासून दाशरथे हे शिवसेनेत विविध शाखा प्रमुख,विभाग प्रमुख, शहर प्रमुख, व आता लोकसभा सहसंपर्क प्रमुख पदावर कार्यरत आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात. 

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नऊपैकी सहा जागांवर विजय मिळवला. मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दाशरथे यांच्या मनसेत प्रवेश घेत असल्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसण्याची शक्‍यता आहे. यावेळी मनसे नेते अभिजित पानसे, राज्य उपाध्यक्ष जावेद शेख,जिल्हा संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर,संदीप कुलकर्णी यांची सुद्धा यावेळी प्रमुख उपस्थिती होती.एप्रिल 2020 मध्ये औरंगाबाद पालिकेची निवडणूक होणार आहे. महाअधिवेशनानंतर मनसेची ताकद वाढताना दिसत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com