दसऱ्याला मनसेचे 'महागाई दहन' आंदोलन 

 दसऱ्याला मनसेचे 'महागाई दहन' आंदोलन 

मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर 'महागाईच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन' करण्यात येणार आहे. भाजप सरकारपुढे 'सत्तेचा थाट' आणि जनते पुढे वाढले 'महागाईचे ताट, भाजप सरकार हाय हाय ....अशा घोषणा करत या महागाईच्या रावणरूपी प्रतिकृतीचे दसऱ्या दिवशी दहन करण्यात येणार आहे. 

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'सरकारनामा' शी बोलताना म्हणाले, "" महागाई विरोधाच्या मुद्यावर मनसे सरकार विरोधात आक्रमक होणार असून 20 फुटी महागाईच्या रावणाची प्रतिकृती दहन करण्यात येणार आहे. दसऱ्यादिवशी दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी रावणाची प्रतिकृती दहन करण्याची आपली परंपरा आहे. म्हणूनच महागाई विरोधात उभारलेल्या हंडी सारखेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रावणरुपी महागाईच्या प्रतिमेचे दहन प्रभादेवी येथील मुरारी मार्गावर होणार आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com