भावाचा मुख्यमंत्री भावाला पाठिंबा नाहीच - मनसे राहणार तटस्थ

महाविकास आघाडीच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मनसे तटस्थ राहणार आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेचे एकमेव राजू पाटील हे विधानसभेत निवडून गेले आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
MNS Will Abstain From Voting in Assembly
MNS Will Abstain From Voting in Assembly

मुंबई : महाविकास आघाडीच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मनसे तटस्थ राहणार आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेचे एकमेव राजू पाटील हे विधानसभेत निवडून गेले आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. 

महाविकास आघाडी सरकारला तीन डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, आजच बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे.  विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आज दुपारी दोन वाजता हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांचे नांव जाहीर केले जाईल. त्यानंतर मंत्रीमंडळाचा परिचय करुन देण्यात येईल व त्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. उद्याही विधीमंडळाचे कामकाज सुरु राहणार असून त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होईल. आपणाकडे बहुमतासाठी 171 आमदारांचा पाठिंबा असल्याचे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com