मीरा-भाईंदरमध्ये मनसेची नव्याने बांधणी  - mns | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

मीरा-भाईंदरमध्ये मनसेची नव्याने बांधणी 

सुचिता रहाटे 
बुधवार, 7 जून 2017

मुंबई : येत्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मनसेने मीरा भाईंदरमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नुकतीच नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा भाईंदर निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नव्याने बांधणी केली आहे. 

पक्ष बळकट करण्यासाठी मीरा भाईंदर मध्ये पदाधिकाऱ्यांची नवी फळी उभारली आहे. यामध्ये प्रसाद सुर्वे यांची शहर अध्यक्ष पदी निवड झाली आहे. तर शहर सचिव पदी नरेंद्र पाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपशहर अध्यक्ष पदी हेमंत सावंत, शशी मेंडन, नरेश चौधरी, योगेश वाघ, दिनेश कनावजे, तर चिटणीस पदी प्रमोद देठे, सतीश जाधव, सुशिल कदम, गिरीश सोनी, जावेद हक्क यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख