mlc jayant patil about bjp's defeat | Sarkarnama

महाराष्ट्रातही भाजपचा पराभव होईल, त्यात शेकापचा वाटा मोलाचा असेल!

संपत मोरे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

आम्ही आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक अलिबाग येथे घेतोय.

पुणे : "वातावरण बदललं आहे, महाराष्ट्रातही भाजपचा पराभव होईल. शेतकरीविरोधी धोरणे राबवणाऱ्या भाजपचा पराभवात शेतकरी कामगार पक्षाचा मोलाचा वाटा असेल," असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला

पाटील म्हणाले, लाट केव्हाच ओसरली आहे. भाजपला परतीचा रस्ता जनता दाखवू लागली आहे. महाराष्ट्रात आम्ही समविचारी पक्ष एकत्र आलोय. आम्ही एकत्रितपणे आगामी निवडणुका लढवणार आहोत. शेतकरी कामगार पक्षाची एकच भूमिका आहे, जागा वाटपावरून कसलेही वाद न करता प्रत्येकाने जमिनीवर राहून जागा मागितल्या पाहिजेत. भाजपचा सगळयांना फटका बसला आहे. त्यामुळे भाजप सत्तेतून जाणं हेच आम्हाला महत्वाचं वाटतं. पाच राज्यातील निवडणूक निकाल पहाता वातावरण बदलले आहे. या निकालाचे परिणाम राज्यात दिसतील. आगामी सरकार हे समविचारी आघाडीचेच असेल. भाजपचा पराभव आता अटळ आहे, असं ते म्हणाले.

राज्यात समविचारी पक्षाची आघाडी व्हावी म्हणून शेतकरी कामगार पक्ष अग्रेसर आहे. आम्ही आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक अलिबाग येथे घेतोय. आम्हाला एक दोन जागा कमी मिळाल्या तरी चालतील पण समविचारी पक्षाची आघाडी झाली पाहिजे, असे पाटील म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख