mlc | Sarkarnama

विनियोजन विधेयक विधान परिषदेत गोंधळात मंजूर

तुषार खरात 
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई ः अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वपूर्ण विनियोजन विधेयक शनिवारी विधान परिषदेत विरोधी पक्षांचा गोंधळ सुरू असताना गोंधळात मंजूर करण्यात आले. अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विधान परिषदेचे कामकाज सुरळीत झालेले नाही. 
प्रशांत परिचारक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आणि नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी गेले 13 दिवस सभागृहात काम होऊ दिले नव्हते. 

जो पर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही असा पवित्रा विरोधकांकडून घेण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर विनियोजन विधेयक विधान परिषदेत मंजूर होणे तांत्रिकदृष्टिने सत्ताधाऱ्यांना महत्त्वाचे वाटत होते. सभागृह चालले नाही तर राज्यपालांकडे जाण्याबाबत सत्ताधारी भाजप विचार करत होता आज विरोधकांचा विधान परिषदेत गोंधळ सुरू असताना अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधेयक मांडले आणि सभापतींनी त्याला सभागृहाची मान्यता असल्याचे स्पष्ट करत विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख