आमदारांमध्ये रंगणार 'फुटबाॅल' सामना

राज्याच्या क्रीडा व युवक खात्याच्या वतीने हा सामना आयोजित करण्यात आला आहे. जागतिक फुटबाॅल महासंघाच्या (फिफा) वतीने येत्या आॅक्टोबर महिन्यात १७ वर्षाखालील मुलांची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा भारतात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तळागाळात क्रीडा संस्कृती रूजविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. त्या अनुषंगाने आमदारांचाही फुटबाॅल सामना होणार आहे.
आमदारांमध्ये रंगणार 'फुटबाॅल' सामना

मुंबई : विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधक असा सामना सतत पाहायला मिळत असतो. विविध मुद्द्यांवरून एकमेकांना वरचढ ठरण्याची एकही संधी न सोडणा-या आमदारांचा वेगळाच सामना येत्या शनिवारी पाहायला मिळणार आहे. हे आमदार चक्क फुटबाॅल खेळणार आहेत.

विधानभवनासमोरील पार्किंगच्या जागेत आमदारांचा फुटबाॅल सामना होणार आहे. यासाठी आमदारांचे विविध संघ बनविण्यात येणार आहेत. हे संघ पक्षनिहाय असणार की विधानसभा - विधान परिषद निहाय असणार या विषयी अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. पण साधारण चार - पाच संघ असतील. महिला आमदारांचाही स्वतंत्र संघ असेल. बाहेरून व्यावसायिक फुटबाॅलपटूंचेही एक किंवा दोन संघ खेळण्यासाठी येणार आहेत, असे सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

राज्याच्या क्रीडा व युवक खात्याच्या वतीने हा सामना आयोजित करण्यात आला आहे.  जागतिक फुटबाॅल महासंघाच्या (फिफा) वतीने येत्या आॅक्टोबर महिन्यात १७ वर्षाखालील मुलांची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा भारतात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तळागाळात क्रीडा संस्कृती रूजविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. त्या अनुषंगाने आमदारांचाही फुटबाॅल सामना होणार आहे.

हा सामना ओव्हल मैदानावर किंवा वानखेडे, ब्रेबाॅर्न स्टेडीयममध्ये आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली होती. पण विधीमंडळातून आमदार निघून गेले तर पंचाईत होईल. म्हणून हा सामना विधानभवनातील पार्किंगच्या जागेत शनिवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत खेळविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com