आमदारांना मिळणार प्रत्येकी 50 लाखांचा विकास निधी; सरकारतर्फे 144 कोटींची तरतूद 

राज्य विधानसभेवर निवडून आलेल्या सर्व नव्या आमदारांना चालू आर्थिक वर्षात आपापल्या विधानसभा मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांचा स्थानिक विकास निधी (आमदार फंड) मंजूर केला आहे. आमदारांना हा निधी येत्या मार्चअखेरपर्यंत खर्च करता येणार आहे
MLAs to get fifty Lack Development fund
MLAs to get fifty Lack Development fund

पुणे : राज्य विधानसभेवर निवडून आलेल्या सर्व नव्या आमदारांना चालू आर्थिक वर्षात आपापल्या विधानसभा मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांचा स्थानिक विकास निधी (आमदार फंड) मंजूर केला आहे. आमदारांना हा निधी येत्या मार्चअखेरपर्यंत खर्च करता येणार आहे. यासाठी सरकारने 144 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व आमदारांना मिळून साडेदहा कोटी रुपयांची विकासकामे करता येणार आहेत. यामुळे नव्या आमदारांना चालू आर्थिक वर्षासाठी त्यांच्या हक्काचा निधी मिळाला आहे.

आमदारांना विकासकामांसाठी दरवर्षी प्रत्येकी दोन कोटी रुपयांप्रमाणे पाच वर्षात दहा कोटींचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. मात्र राज्य विधानसभेची निवडणूक ऑक्‍टोबर 2019 मध्ये घेण्यात आली. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मावळत्या विधानसभेतील सर्व आमदारांनी सन 2019-20 या चालू आर्थिक वर्षाचा दोन कोटी रुपयांचा निधी हा निवडणुकीपूर्वीच खर्च केला होता. परिणामी ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार झालेल्यांना चालू आर्थिक वर्षासाठी त्यांच्या हक्काचा निधी नव्हता. तो आता उपलब्ध झाला आहे.

पुणे शहरात आठ, पिंपरी चिंचवडमध्ये तीन आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा असे एकूण 21 विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या सर्व आमदारांचा मिळून जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी 42 कोटी रुपयांचा आमदारनिधी उपलब्ध होत असतो. यानुसार पाच वर्षात फक्त विधानसभेच्या आमदारांचा पुणे जिल्ह्याला 210 कोटी रुपयांचा आमदारनिधी उपलब्ध होत असतो. याशिवाय विधान परिषदेचे आमदार, लोकसभेचे खासदार आणि राज्यसभेचे खासदार यांचा स्थानिक विकास निधी वेगळाच असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com