MLA's car gives dash to police constable | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मुंबई : आमदाराच्या मोटारीची  पोलिसाला धडक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई :  मुलुंड येथे भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने वाहतूक पोलिस चौकी आणि दुसऱ्या मोटारीला धडक दिली.

या अपघातात एका पोलिस हवालदारासह तीन जण जखमी झाले . अपघात करणारी मोटार आमदार सरदार तारासिंह यांची असल्याचे समजते. 

मुलुंड लिंक रोडवरील सोलापूर जंक्‍शन परिसरात शुक्रवारी  भरधाव मोटारीने दुसऱ्या मोटारीला धडक दिली. त्यानंतर तिने वाहतूक चौकीच्या भिंतीला धडक दिली. या अपघातात दुसऱ्या मोटारीचा चालक पुंडलिक कुलाल आणि पोलिस हवालदार उमेश ईषी जखमी झाले. भरधाव मोटार चालवून अपघात करणाऱ्या मोटारीच्या चालकाचे नाव महेंद्र गुप्ता आहे. तोही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडला तेव्हा तारासिंह मोटारीत नव्हते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख