MLA's Australia tour postponed due to sepecial session | Sarkarnama

विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामुळे आमदारांचा ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर

तुषार खरात
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

अवघ्या १० दिवसानंतर म्हणजे १ मे रोजी हे आमदार दौ-यावर जाणार होते. १५ मे पर्यंत दौ-याचा कालावधी होता. त्यासाठी व्हिसा काढण्यापासूनचे सोपस्कारही युद्धपातळीवर सुरू होते. बँगा भरून तयारीत असलेल्या या आमदारांच्या उत्साहावर विशेष अधिवेशनामुळे विरजण पडले आहे.

मुंबई - जीएसटीच्या विधेयकाला मंजुरी देण्याच्या अनुषंगाने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यात बोलविण्याचा तत्वत:  निर्णय झाला आहे. त्यामुळे याच कालावधीत आमदारांसाठी निश्चित केलेला ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर टाकण्यात येणार आहे. जून महिन्यात हा दौरा होईल, असे विधीमंडळातील अधिकृत सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

अवघ्या १० दिवसानंतर म्हणजे १ मे रोजी हे आमदार दौ-यावर जाणार होते. १५ मे पर्यंत दौ-याचा कालावधी होता. त्यासाठी व्हिसा काढण्यापासूनचे सोपस्कारही युद्धपातळीवर सुरू होते. बँगा भरून तयारीत असलेल्या या आमदारांच्या उत्साहावर विशेष अधिवेशनामुळे विरजण पडले आहे.

ऑस्ट्रेलियातील संसदीय कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी विधानपरिषदेतील तब्बल २१ आमदार दौ-यावर जाणार होते. यांत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे यांचाही समावेश होता. १५ दिवसाच्या कालावधीत तेथील संसदेला भेट देणे, तेथील राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास करणे, तेथील मान्यवरांच्या भेटी घेणे असा कार्यक्रम ठरला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख