२७० किलोंचा हार टिळेकरांना उमेदवारी मिळवून देणार? 

आज सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेन्द्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे पुणे शहरात शेवळवाडी येथे आगमन होणार आहे. हडपसर मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांनी हडपसर गाडीतळ येथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री यांना घालण्यासाठी २७० किलो फुले वापरून हार तयार करवून घेतला आहे.
270 KG Garland Prepared for CM by MLA Yogesh Tilekar
270 KG Garland Prepared for CM by MLA Yogesh Tilekar

पुणे : आज सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेन्द्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे पुणे शहरात शेवळवाडी येथे आगमन होणार आहे. हडपसर मतदार संघाचे आमदार  योगेश टिळेकर यांनी हडपसर गाडीतळ येथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री यांना घालण्यासाठी २७० किलो फुले वापरून हार तयार करवून घेतला आहे. टिळेकर हडपसर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

मार्केट यार्ड फुल बाजार मधील फुलांचे व्यापारी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हरिभाऊ कामठे यांनी हा हार तयार केला आहे. ह्या मध्ये १००किलो हिरवी पाने आणि १७० किलो झेंडू व इतर फुलांचा वापर केला आहे. १५महिला कामगार आणि १० कारागीर यांनी मेहनत घेऊन या महाकाय हाराची निर्मिती केली आहे. या हाराला योग्य गोल आकार यावा या साठी सहा सायकलच्या चाकांच्या स्टीलच्या रिमचा वापर केला आहे.

या पूर्वी गुजरात मध्ये १६० किलो वजनाचा हार बनविण्यात आला होता. त्याचा विक्रम मोडून लिम्का वर्ल्ड बुक मध्ये नोंद होण्यासाठी या हाराची निर्मिती केली आहे. आज सायंकाळी आमदार योगेश टिळेकर हडपसर येथे क्रेनचा वापर करून मुख्यमंत्र्यांना हा हार घालणार आहेत, असे हरिभाऊ कामठे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com