साधा 'आमदार'

मतदारांनी एखादा आमदार, खासदार तर सोडाच, पण नगरसेवकालाही निवडून दिले, की पुन्हा ते 'साहेब', त्याच मतदारांकडे फिरकतीलच याची शाश्वती नाही. जरी फिरकले तरी एखादे सन्मानपूर्वक आमंत्रण असेल तरच, अन्यथा तिकडे ढुंकूनही पाहायची तसदी हे 'साहेब' घेत नाहीत, याची असंख्य उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेतच! परंतु, शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार विजय काळे मात्र त्यास अपवाद आहेत. एखादा नगरसेवक जितक्‍या सहज उपलब्ध होत नाही, तितक्‍या सह
साधा 'आमदार'

तदारांनी एखादा आमदार, खासदार तर सोडाच, पण नगरसेवकालाही निवडून दिले, की पुन्हा ते 'साहेब', त्याच मतदारांकडे फिरकतीलच याची शाश्वती नाही. जरी फिरकले तरी एखादे सन्मानपूर्वक आमंत्रण असेल तरच, अन्यथा तिकडे ढुंकूनही पाहायची तसदी हे 'साहेब' घेत नाहीत, याची असंख्य उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेतच! परंतु, शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार विजय काळे मात्र त्यास अपवाद आहेत. एखादा नगरसेवक जितक्‍या सहज उपलब्ध होत नाही, तितक्‍या सहज आमदार काळे लोकांना उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. लोकांच्या समस्या छोट्या असो किंवा मोठ्या त्या शांतपणे ऐकून घेण्यापासून ते त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी आदर आहे.

महापालिकेत अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केल्यामुळे काळे यांना शहराच्या बहुतांश समस्यांची आणि एकूणच शहराची खडानखडा माहिती आहे. त्यातच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काळे यांना शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले. काळे यांनीही आपण निवडून येऊ की नाही, हा विचार न करता त्या दिवसात सर्व मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला होता. पंचतारांकित सोसायट्या असो, किंवा झोपडपट्टी काळे यांनी मतदारांशी निवडणुकीवेळी जोडलेले नाते पुढेही कायम ठेवले. आपल्या मतदार संघातील एखादा गर्भश्रीमंत असो किंवा हातावर पोट भरणारा गरीब, कष्टकरी अशा सगळ्याच घटकांना काळे यांच्याकडून तितकीच आदराची वागणूक मिळत असल्याचीही चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काळे यांनी मतदारसंघाच्या मोठ्या समस्यांबरोबरच बारीकसारीक कामांकडेही बारकाईने लक्ष द्यायला सुरवात केली. निवडणुकीवेळी केलेल्या जनसंपर्काचा फायदा त्यांना महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासही झाला.

खडकी कॅन्टोन्मेंटच्या समस्या असो किंवा तेथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो, किंवा एखाद्या सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असो. ते प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका, पोलिस व अन्य विभागाच्या तत्काळ बैठका घेऊन ते काम पूर्ण होईपर्यंत त्याचा सतत पाठपुरावा करण्याचे कामही काळे तितक्‍याच चांगल्या पद्धतीने करतात. एवढेच नाही तर, ''तुम्ही कामे सांगा मी निधी आणतो'', अशा शब्दात काम करणाऱ्यांना ते प्रोत्साहनही देतात.

लोकांमध्ये 'साधे आमदार' अशी ओळख निर्माण केलेल्या काळे यांचा स्थानिक पातळीवरील विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशीही तितकाच चांगला संबंध आहे. खडकी कॅन्टोन्मेंट काँग्रेसकडे आहे, तरीही तेथील लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देऊन काळे खडकीतील प्रश्‍न सोडविण्यासही प्राधान्य देतात. याबरोबरच विकासकामांसाठी भरीव निधीही उपलब्ध करून देतात. एकूणच राजकारणासारख्या 'ग्लॅमरस' क्षेत्रातही साधेपणाला महत्त्व देणाऱ्या काही मोजक्‍या लोकांमध्ये आमदार काळे यांचा हमखास समावेश होतोच!

राहणीमानही साधेच !
साधा शर्ट, साधी पॅंट आणि साधीच चप्पल अशा अतिशय साध्या राहणीमान असणारे काळे एखादा कार्यकर्ता बरोबर घेऊन 'बाईक'वर मतदारसंघ फिरतानाचे चित्र कायम दिसते. विशेषतः ओजस्वी बोलण्यामुळे ते आमदार असूनही सामान्य नागरिकांना आपल्यातीलच वाटत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. पक्षाचा छोटा-मोठा कार्यकर्ता असो किंवा ज्येष्ठ नागरिक, महिला विद्यार्थी सगळ्यांशीच प्रेमाने, आदरपूर्वक बोलण्याची काळे यांची खासियत लोकांना अधिक भावते. त्यामुळे की काय, नगरसेवकाने करावयाचे एखादे काम ही इथला मतदार थेट आमदार काळे यांना फोन करून सांगतो. इतका साधेपणा, मोकळेपणा काळे यांच्याकडे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com