mla vijay autti ful confiendence about winnig election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मी 50 हजारांनी आमदार होणार, बिनधास्त रहा : विजय औटी 

मार्तंड बुचुडे 
सोमवार, 23 जुलै 2018

औटी म्हणाले, शिवसेनेला सत्ता मिळवून देण्यात युवा शिवसेनेची महत्वाची भूमिका आहे. राज्यात होणा-या एकूण मतदानापैकी सुमारे 28 टक्के मतदान तरूणांचे आहे. यापुढील काळात शास्त्रशुद्ध पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल. कोणाच्या खांद्यावर बसून निवडणुक लढविता येणार नाही. त्यातून निवडणुका जिंकता येत नाहीत, अशी टीका नीलेश लंके यांचे नाव न घेता केली. 
 

पारनेर (जि. नगर) : राज्यातील राजकारण एका निर्णायक वळणावर आले आहे. यावेळी शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कोणी कितीही पकटू द्या, मी 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेवून निवडून येणार, असा विश्वास आमदार विजय औटी यांनी व्यक्त करून कार्यकर्त्यांना बिनधास्त राहण्याचा सल्ला दिला आहे. 

वाडेगव्हाण येथील युवा सेनेच्या शाखेच्या उदघाटनाच्या निमित्ताने औटी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. या वेळी युवा सेनेचे जिल्हा विस्तारक उमेश पाटील, जिल्हा परिषदचे सदस्य काशिनाथ दाते, सेनेचे उप-जिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, माजी सभापती गणेश शेळके, डॉ. श्रीकांत पठारे, महिला आघाडी प्रमुख उमा बोरूडे, सरपंच बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख